लिपिनिरूपण. ३०१ कोणत्या त-हेनें उदयास आली; आणि ती उदयास आणण्यास कोण कारणीभूत झाले; याविषयी विचार करूं. हरएक शास्त्रांत आणि नानाविध कलांत, आमच्या आर्यपूर्वजांचेच सर्व प्रकारचे शोध असल्याकारणाने, त्यांच्याकडे ज्याप्रमाणे त्यांचे उत्पादकत्व सहजच येते, त्याचप्रमाणे आपले असंख्य व अमूल्य विचार प्रदर्शित करण्यासाठी, म्हणजे अर्थात् ते लेखनद्वारा चिरकाळ राहावे म्हणून, त्यांनी आपली अद्वितीय कल्पना लढविली, व ते अग्रेसर झाले, याविषयी तिलमात्रही शंका नाहीं. | असो. ही लेखनकला प्रथमतः आयनीच शोधून | काढिली असे प्रतिपादन करण्यास आनुमानिक प्र अ. काय आधार आहे, किंवा ते खरें माण. मानण्यास कोणते प्रमाण आहे, असे कोणी विचारील तर, त्याला श्रुतिस्मत्यादि ग्रंथसमूहाकडेच बोट दाखविलें, झणजे त्याची सर्व जिज्ञासा परिपूर्ण होण्यासारखी आहे. मात्र, तो शोधक आणि परीक्षक असून, दुराग्रही नसला पाहिजे. याखेरीज, आमच्या मताला पुष्टी देणारे कित्येक पौरस्त्य व पाश्चात्य पंडितांचे देखील सप्रमाण लेख आहेत. सबब, त्याबद्दलही योग्य विचार झाला पाहिजे. | शिवाय, ज्या आर्य लोकांनी हरएक शास्त्रकलांत शोध केला, त्यांनी सर्वोपयोगी लेखनकला शोधून काढण्याच्या | १ The Bible in India. 9 Early excellence of the Brahman's in all these branches of learning. ( Elphinstone's India, P. P. 92-95). २६
पान:भाषाशास्त्र.djvu/310
Appearance