६ स्ल्यॉव्हॉंनिक् अथवा विंडिक् आणि
७ सेल्टिक्
आतां, संस्कृत मायभाषेच्या ज्या मुख्य शाखा सदरीं नमुद केल्या, त्यांचेही अनेक पोटभेद असून, ते फार महत्वाचे आहेत. सबब, विषयविवेचनाच्या सोईसाठीं, व वाचकास इतल्ला पाहण्यास स्वल्प पडावें म्हणून, त्यांचीच अवश्य ती हकीकत प्रथमतः देतों.
भारतीय किंवा हिंदी शाखेचे पोटभेद.
१ भारतीय किंवा हिन्दी शाखेचे १ पाली आणि २ प्राकृत असे दोन पोटभेद आहेत. ह्यापैक, पाली हल्ली प्रचारांत नसून ती मृत भाषा झाली आहे. प्राकृताचे मात्र १ शौरसेनी, २ गौडी, ३ लाटी, ४ पैशाची, ५ आवन्ती, ६ मागधी, ७ अर्ध मागधी, ८ प्राची, ९ महाराष्ट्री, १० द्राविडी, व ११ बाल्हीकी, असे मुख्य अकरा प्रकार असून, ह्याशिवाय आणखीही प्रांतिक भेद पुष्कळच आहेत. ह्यापैकी, महाराष्ट्री आणि द्राविडी१, खेरीज करून, बाकीच्या बहुतेक मृत भाषा होऊन, त्यांच्या ऐवजी हिन्दुस्थानी, बंगाली, पंजाबी, गुजराथी, ऊरीय, ऊर्दू, सिन्धी, पहाडी, आसामी, मारवाडी, कच्छी, हळवी, काश्मीरी, गोवाणी, इत्यादि अनेक भाषा उद्भवल्या आहेत.
आतां, सर्व आर्य भाषांचे मूळ संस्कृतच असल्या
१ द्राविडी भाषेचा समावेश कित्येक पाश्चात्यांनी तुराणी वर्गात केला आहे. (भारतीय साम्राज्य. उत्तरार्ध. पु. ९ वें. भाग ५५-५६. पान १५१-१५२ व २१५ ते २२५ पहा.)