Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/303

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ... भाग सातवा. == 09 लिपिनिरूपण. भाषाशास्त्र विवेचनांत, वर्ण आणि लिप यांचा शास्त्रीय दृष्टया परस्पर विशेष र मन्वय, किंबलिपिनिरूपण. हुना प्रत्यक्षच संबंध असल्यामुळे, मागील भागांत वर्णविचाराचे यथावकाश दिगदर्शन केले. तेव्हां, वर्णविचारानंतर, लिपिविषयक दोन शब्द तरी लिहिल्याशिवाय गत्यन्तरच नाही, असे समजून, प्रस्तत भागांत लिपिनिरूपण करण्याचे योजिले आहे. लेखनकला ही एक इतकी अपूर्व चीज आहे की, ती जर कोणाला माहीत नसती, तर लेखनकलेचें म | जगाची केवढी हानि झाली असती, याची कल्पना सुद्धा होण्यासारखी नाहीं. अर्थात् , ह्या दृष्टिगोचर होत असलेल्या अगाध ग्रंथसंपत्तीचा मागमसही राहिला नसता. सर्व शोधांस हरताळ लागली असती. शास्त्र व कला यांचा विध्वंस झाला असता. लिपि हे भाषेचे मूळ अंग असल्यामुळे, तदभावात् सर्वत्र अंधकारच मातला असता. भाषाशास्त्राचे तर नांवच राहिले नसते. शब्दव्युत्पत्तीने आपला गाशा गुंडाळला असता. व्याकरण व न्याय, पूर्वमीमांसा अथवा कर्मकांड, उत्तरमामांसा अथवा ज्ञानकांड, गणित व भूमिति, भूगोल हत्व.