३९२ भाषाशास्त्र. इ. स. १६६८ साली विशप विल्किन्सनें “भाषेचे खरे तत्व आणि स्वरूप, या नावाचा ग्रंथ छापला. परंतु, त्याचा म्हणण्यासारखा कांहीं एक उपयोग न होतां, ही भाषेची चळवळ सुमारे अर्ध शतकपर्यंत, केवळ थिजलेल्या अवस्थेतच राहिली. तदनन्तर, इ. स. १७११ व्या वर्षी, भाषेची विशेष सुधारणा व्हावी म्हणून, डीन स्विफ्टनें ज्यास्त हालचाल करून, इंग्लंडच्या मुख्य प्रधानाजवळ देखील दादं मागितली. परंतु, त्याचा लेशमात्रही उपयोग झाला नाही; आणि अशाच प्रकारच्या वाटाण्याच्या अक्षदा, इ. स. १७६८ साली बेन्जामिन् फ्रांकालनने केलेल्या प्रयनासही लागल्या. आतां, अशा प्रकरची प्रगति होण्यास कोणती आड. वर्णविन्यासाची प्र- काठी येते, याबद्दलचा तपास करतां गति होण्यास मानीव असे कळून येते की, ** अशा रीतीने अडचण. भाषेतल्या वर्णविन्यासांत फेरफार केल्यास मूळधातु नाहीसे होतील. सबब, तींत नवीन फेरफार करण्याचे कारण नाही. आणि ह्याच सबबीवर भाषेच्या वर्णरचनेत सुधारणा करण्याचे काम इंग्लंडसारख्या सुधारलेल्या देशांतही अटकून राहिले, व मागासल्यासारखे झाले. १ Swift's * Works. IX. P. P. 137-139. ( Edited by Sir. W. Scott. ). । २ ह्या बावतींत, सेस हा एके ठिकाणी असे म्हणतो की, “ It is carious to find the wholly jection already put forward that “aí our etymologies mistaken obWould be ost." by a reform of spelling. ( Introduction to the Science of Language. vol. P. 332 ).
पान:भाषाशास्त्र.djvu/301
Appearance