वर्णविचार. २९१ लिखित एलिसला उपलब्ध झालें, व ते इ. स. १९९१ साली, चेस्टरचा राहणार कोणी एक जॉन हार्ट याने लिहिले होते, असे कळते. तदनन्तर, आपण बोलत तसे लिहावें या हेतूने, आणि इंग्रजीत एका प्रकारचे वर्ण लिहिले जाते असून त्यांचा अन्य तव्हेने उच्चार करण्यांत येतो, व त्या योगाने वणचा दुरुपयोग होतो तो होऊ नये म्हणून, इ. स. १५६९ साली, मजकूर हार्टनें, 4 वर्णविचार " नांवाचे पुस्तक लिहिले. परंतु, याच्याही पूर्वी सुमारे एक वर्ष अगोदर झणजे इ. स. १९६९ साली, * आंग्ल भाषेतील लेखनशुद्धि' या नांवाचे पुस्तक सुर टाँमस् स्मिथने छापिलें, अणि त्यांत अपूर्ण वर्णाऐवजी नूतन संज्ञा तयार करून, एकंदर चौतीस वर्ण इंग्रजी भाषेत असावेत, असे त्याने सुचविले. पुढे, इ. स. १९८० त, विल्यम बलोकने दुसरे एक पुस्तक छापलें, व त्यांत त्याने सदतीस वर्ण चे प्रति. पादन केले. इ. स. १६ १९ मध्ये, डाक्तर गिलने ** आंग्लभाषा नांवाचे पुस्तक तयार करून, ह्या भाषेचे चाळीस वर्ण ठरविले. ह्याच्या मागून इ. स. १६३३ साली बटलरने ‘इंग्रजी व्याकरण' छापलें, व त्याच्या पुढल्या वर्षी, * मधुमक्षिका” नांवाचे पुस्तक प्रसिद्धीस आणिलें. | १ * इंग्रजी भाषेतील अयथार्थ आणि भ्रांतिमूलक वर्णवन्यासाचे विवेचन " हे ह्या लेखाचें नामधेय होय. • The opening of the unreasonable writing of our English tongue, wherein is shewed what neces. sarily is to be left, and what followed for the perfect writing thereof. " "२ • The Feminine Monarchy or History of the Bees. " ( Oxford. 1634. ) ।
पान:भाषाशास्त्र.djvu/300
Appearance