Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७
सामान्यविवेचन व दिग्दर्शन.

असल्याचें दिसत नाहीं. इतकेंच नव्हे तर, उपलब्ध झालेल्या भाषांचे विवेचन सशास्त्र व्हावे, एतदर्थ प्रयत्न केल्याचें सुद्धां भासत नाहीं. कारण, त्यांत भाषांची वर्गवारी भूविषयक केली असून, त्या आशियांतील, यूरोपांतील, आफ्रिकेंतील, अमेरिकेंतील, आणि सामुद्रिक किंवा द्वीपसमुहांतील, अशा योजिलेल्या आहेत. त्यामुळें, त्याचा व्हावा तितका उपयोग होत नाही. परंतु, असें आहे तरी, कोणकोणत्या भाषांत कशा प्रकारचें साम्य आहे, हें कळण्यास त्याची प्रथमारंभी विशेष मदत झाली, हें कोणालाही कबूल केलें पाहिजे.

त्यांचे वर्गीकरण.

 असो. ह्या सर्व भाषांचे सूक्ष्म अवलोकन केल्यानें, असें दिसून येतें कीं, ह्यांपैकीं कित्येकांतील शब्दांत, किंवा विभक्तांच्या प्रत्ययांत, अथवा क्रियापदांच्या रूपांत, फारच निकट साम्य आहे. कित्येकांत हे सादृश्य म्हणण्यासारखें नसून, क्वचित् तें बिलकुल दृग्गोचरही होत नाहीं. आणि कांहींची रचना खरोखर अगदींच भिन्न आहे. तेव्हां, ह्या सर्व गोष्टी मनांत आणून, आपण ह्या अगाध भाषारत्नाकरांत बुडी मारिली, अगर ह्या विचित्र वागुदधीचे शास्त्रोक्त पद्धतीनें यथान्याय मंथन केलें, तर आपणांस असे निःसंशय कळून येईल कीं, कांहीं भाषांचे संस्कृताशीं अत्यन्त साम्य आहे. सबब, त्यांचा समावेश आर्य कुटुंबांतच झाला पाहिजे; कारण, संस्कृत ही आर्य कुटुंबांतील सर्व शाखांची आदिजननी होय.


 १ संस्कृतभाषेकडे मातृपदाचा बहुमान कोणत्या कारणांनी येतो, याबद्दलचा साद्यन्त ऊहापोह आणि तपशिलवार हकीगत, आम्हीं

(पुढे चालू)