पान:भाषाशास्त्र.djvu/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७० भाषाशास्त्र. त्यामुळे, त्यांनी ह्या मायभाषेला मातृपदाचा उचित मान देऊन, तिच्या दिव्य आणि अनुपम ज्ञानभांडाराचा यथाशक्ति लाभ करून घेण्यास्तव, तच्चरणकमलयुगल सदैव तत्पर असणे देखील अत्यवश्य आहे. असो. अशा प्रकारे संस्कृत भाषेला सर्व त-हेनें पूर्णत्व - यण्यास, आमचे पूर्वजच कारणीभूत त्याचे कारण. ९. असून, त्यांनी तिला उन्नतावस्थेच्या अगदी उच्च कोटी प्रत पोहोचविण्यासाठी, प्रथमपासूनच भगीरथ प्रयत्न केले असल्याचे उघड दिसते. म्हणजे अर्थातच, श्रीगणेशायनमः पासून तों तहत काव्यदोहन आणि शास्त्रान्वेषणापर्यंत, त्यांनी केवळ अश्रान्त परिश्रमच चालविले होते, यांत तिळमात्रही शंका नाही. तात्पर्य, आमचे मूलवर्ण, अथवा आम्हां आर्यांच्या शैझवावस्थेतील धूलाक्षरे, हीच तिच्या उत्कृष्टावस्थेचे आधारस्तंभ होत असे समजून, ती आमच्या पूर्वजानी सर्व प्रकारे पूर्णत्वास आणिली; त्यांची यथोचित आणि स्थानात्मक व्यवस्था सुद्धा त्यांनीच लाविली; आणि तविषयक सशास्त्र व पद्धतशीर मीमांसा देखील आमच्या ह्या पुराण ऋषिवयांनीच केली. सबब, तत्संबंधी यथार्थ दिग्दर्शन होण्यासाठी, आमच्या मुलवणंचा अल्पवृत्तान्त प्रथमतः देतो; आणि नन्तर इतर भाषांच्या तुलनेने काय निष्पन्न होते, हे समजण्याकरितां, त्याजबद्दलची सुद्धा थोडीशी हकीकत वाचकापुढे ठेवितों. आतां, पद्धतशीर विवेचन होण्यासाठी, प्रथमतः पौरस्त्य भाषा घेऊन, नंतर पाश्चात्य भाषांकडे वळू.