पान:भाषाशास्त्र.djvu/265

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५८ भाषाशास्त्र. व चन्द्र ग्रहणाचा काल, इत्यादि संबंधी बरेच महत्वाचे शोध केले होते. त्यामुळे, त्यांची खरी उपयुक्तता खालीफ मजकूरच्या लक्षात येऊन, त्याने त्या ग्रंथांचे भाषांतर करण्याविषयी हुकूम केला. तदनन्तर, महमद बिन इभ्राइम अलफझारीने हे जोखमीचे काम आपल्या शिरावर घेतले, आणि ह्या ज्योतिष ग्रंथाचे भाषान्तर झाल्यावर, त्याने त्याला सिन्द-हिन्द असे नामधेय दिले. ह्यालाच हिन्द-सिन्द अशी देखल संज्ञा आहे, व हा शब्द सिद्धान्त शब्दाचा अपभ्रंश असल्याचे दिसते. कोलबूकचे असे मत आहे की, ब्रह्मगुप्ताने ब्रह्मसिद्धान्त नांवाचा जो ग्रंथ केला आहे, त्याचेच सिद्ध-हिन्द में अपभ्रष्ट रूप होय, तथापि, बेन आल आदमीचा अभिप्राय याहुन भिन्न असून, तो असे म्हणतो की, सिन्द-हिन्दचा अर्थ परिवर्तियुग असा होतो. हैं भाषान्तर इ. स. ७७१ साली तयार झाले असल्याविषयी आलाबरूणीचे मत आहे. | ह्याच सुमारास याकुब बिन थारेक यानंही विद्यावृद्धि सुश्रुतादि वैद्यकीय आणि ज्ञानप्रसाराच्या कामी, इराणांत याच इराणीत भा- थोडीबहत चळवळ आरंभिली होती.

  • असे दिसते. कारण सिन्द-हिन्दवरून त्याने एक ज्योतिषग्रंथ तयार केला असून, संस्कृत तील अन्य ग्रंथांतून भाषांतर करण्याचे कामही झपाट्याने सुरू होते. हारूण आल राशीद हा तर एकंदर खालिफांत फारच विद्वान, मर्मज्ञ, व शोधक असे. इतकेच नव्हे तर, त्याला विद्येची विशेष गोडी आणि विलक्षण अभिरुच होती. त्यामुळे, त्याच्या पदरीं अनेक पंडित व शास्त्रज्ञ असत. इ. स.

१ Reinaud 1, c. P. 314. । पांतर.