पान:भाषाशास्त्र.djvu/26

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५
सामान्यविवेचन व दिग्दर्शन.



तील शब्दरत्नांचे इतिहासदृष्ट्या परीक्षणच होय, असेंही म्हटलें असतां बाध नाहीं.

भाषाशास्त्राची इतिहासशास्त्रांत गणना.

 अशा प्रकारची वस्तुस्थिति असल्यानें, भाषाशास्त्राची गणना पदार्थविज्ञानशास्त्रांत न करतां, ती ऐतीह्य किंवा इतिहासशास्त्रांतच करणे विशेष पद्धतशीर होईल, अशी माझी अल्प समजूत आहे.

 तथापि, प्रोफेसर मॉक्समुलर प्रभृति, या मताविरुद्ध आहेत. आणि डाक्तर व्हेवेल वगैरे जरी त्यांच्या अभिप्रायास अनुकूल नाहींत, तरी मॉक्समुलर हे असे प्रतिपादन करतात कीं, भाषाशास्त्राचा समावेश पदार्थविज्ञान शास्त्रांतच झाला पाहिजे.

 असो. ह्या भाषाशास्त्राचे सविस्तर निरूपण करावयास लागलें, म्हणजे ह्या भूतलावर एकंदर भाषा किती आहेत, व त्यांतही प्रमुखत्वानें कोणाची गणना होते, त्यांचे वर्गीकरण कसें करण्यांत येतें, इत्यादि संबंधाचे महत्वाचे प्रश्न एकामागून एक असे, सहजींच उत्पन्न होतात. सबब, त्या बाबतींत अवश्य ती तपशीलवार हकीकत आरंभींच देणे इष्ट वाटल्यावरून, प्रथमतः तिकडेच वळतो.


( मागील पृष्टावरून पुढें चालू )

उद्गम देखील ह्याच शब्दापासून आहे; एथिओपियन शब्दाचा धात्वर्थ (एथिऑप्स, ऐथाँप्स, म्हणजे उग्राकृति होय; व तो शब्द 'ऐथीन्' aithein शब्दापासून झाला असून, त्याचा अर्थ ) पेटविणे, जाळणे, असा होतो. (कर्शियस पहा.)

 १ Lectures on the science of Language. vol. I P. P. 30-31. Lecture 2nd.