पान:भाषाशास्त्र.djvu/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
भाषाशास्त्र.



कारणीभूत झाला आहे याचा विचार केला, म्हणजे भाषा ही दैवी नसून, ती समाजघटितच आहे, असें म्हणणें प्राप्त येतें.

तसे मानण्यास कारणे.

 कारण, आपले विचार एकमेकांस सुलभ रीतीनें प्रदर्शित करता यावेत एतदर्थ, जी सांकेतिक चिन्हें मनुष्यानें ठरविलीं, अथवा परस्परांचे विचार आपापसांत कळण्यास ज्या वाक्संज्ञा त्यानें अमलात आणिल्या, त्यांसच भाषा अशी संज्ञा असल्यामुळें, ती कृतक आहे, आणि अमानुषी नाहीं, हे उघडच सिद्ध होते.

 शिवाय, भाषाशास्त्र म्हणजे ह्या भूतलावर हल्लीं व्यवहारांत असलेल्या, किंवा पूर्वी प्रचलित होत्या अशा एकंदर भाषांचा इतिहासच मानावयाचा. अथवा, आशिया, यूरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आणि अमेरिका, या विशाल रंगभूमीवर जे भाषांचे एकावर एक असे अनेक पडदे पडत गेले, त्यांचें अवलोकनच समजावयाचें; अगर, उत्तर टोकाकडील उत्तरकुरु, व दक्षिणेकडील सिध्धी, आणि त्यांच्या दरम्यान राहणारे लोक, यांच्या भाषा


 १ ह्या उत्तरकुरूंस ग्रीस देशांतले लोक हायपरबोरियन्स म्हणत. ह्या ( Hyperboreans ) शब्दाचा अर्थ 'पर्वतापलीकडील' असा होतो. ह्यांतील उत्तरार्ध ( Boros ) बोरॉंस असून, तो ओराँस ( oros ) पर्वत, या शब्दापासून झाला आहे; व हा शब्दही संस्कृत 'गिरि' शब्दापासूनच बनला असल्याचे दिसतें. प्राचीन स्लॉव्हॉंनिक भाषेंत ह्या शब्दाचें रूप 'गोरा' असें झालें आहे.

 २. हा शब्द संस्कृत ( इन्ध = पेटविणें, या ) शब्दापासून झाला असावा, असें वाटते. एथियोपियन् ( Ethiopean ) शब्दाचा

( पुढे चालू )