भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २४७ साठी, त्यांनी आपले लक्ष्य तिकडे लागलीच पोहोचविलें, आणि संस्कृत भाषेतील सर्व शब्दांचा शास्त्रीय कोश तयार केला. ह्या शास्त्रीय कोशांसंबंधी, आदिप्रयत्न कोणाचे व कोणते होते, हे खात्रीपूर्वक निश्चित प्राचीन काशकार करण्यास हल्ली एकही साधन उपलब्ध नाही. तथापि, फार प्राचीन काळी, असे कोशकार होऊन गेले होते, याविषयी मात्र तिळभर देखील शंका राहत नाही. कारण, त्याबद्दलचा स्पष्ट उल्लेख प्रत्यक्ष अमरसिंहानेच आपल्या कोशांत केला असून, तदाधारेच आपण आपला ग्रंथ तयार करीत असल्याचे त्याने लिहले आहे. समाहत्यान्यतंत्राणि संक्षिप्तैः प्रतिसंस्कृतैः ।। संपूर्णमुच्यतेवगैर्नामलिंगानुशासनम् ॥ ५ ॥ ( अमरकोश. प्र. कां.) प्राचीन कोशकारांत, अति प्राचीन असा व्याडीच होय, असे वाटते. कारण, एका कवीने सुप्रसिद्ध कोशकारांची जी एकंदर नामावलि दिली आहे, तींत व्याडीचे नांव बरेच वर आहे. मेदिन्यमरमालाच त्रिकांडौ रत्नमालिका। रन्तिदेवो भागुरिश्वव्याडिःशब्दार्णवस्तथा ।। ।। द्विरूपश्च कलिंगश्च रभसःपुरुषोत्तमः । । दुर्गोऽभिधानमालाच संसारावर्तशाश्वत ॥ विश्वबोपालितश्चैव वाचस्पतिहलायुधौ।। हारावलीसाहसको विक्रमादित्य एवच ॥
पान:भाषाशास्त्र.djvu/254
Appearance