पान:भाषाशास्त्र.djvu/252

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २४९ रामेश्वरकृत टीकासमेत सुधाशुबोध. हे व्याकरण विशेष प्रचारांत नाहीं. जीवघोषस्वामीकृत हरिनामामृत. हे व्याख्यासहित व्या करण आहे. चैतन्यामत नांवाचें ही टीकासमेत व्याकरण असन, ह्याखे.. | रीज आशुबोध, लघुबोध, शिघ्रबोध, सारामृत, दिव्य, पदावली, उल्का, अशी अनेक व्याकरणे आहेत. रामनारायणकृत कारिकावली. हे श्लोकबद् व्याकरण आहे. विमलसरस्वतीकृत रूपमाला, व काशीश्वरकृत ज्ञानामृत, हीं देखील व्याकरणेच आहेत. ह्याशिवाय, भट्टमल्ल, गोविन्द भट्ट, चतुर्भुज, गाडिसिंह, गोवर्धन, व शरणदेव, यांची नावे सुद्धां धातुदीप केंत दृग्गोचर होत असून, व्याघ्रभूति आणि व्याघ्रपाद यांची वार्तिकेही आधारभूत मानली आहेत. ह्यावरून, या भूतलावरील इतर सर्व राष्ट्रांच्या प्रमा णाने, आमच्या भरतखंडांतील संस्कृत भाषाशास्त्र हे किती प्रगल्भते प्रत पोहोचले होते, याची खरी कल्पना वाचकास सहजीं होण्यासारखी आहे. १ माँनियर विल्यम्स म्हणतो, ८८ 'I'o Patanjali, we owe one of the most wondel:- ful gramihatical works, that the genius of any country hals ever produced, viz the Mahâ-Bhâshya or great conmentary'.. (Indian Wisdom. P. 177) वेवर लिहतो, ce And grammatical literature in general attained to a most remarkably rich and extensive develop. ment." ( H I. L. P. 228 ).