पान:भाषाशास्त्र.djvu/251

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ भाषाशास्त्र, काशीश्वर व नन्दकिशोरकृत मुग्धबोध परिशिष्ट. बोपदेवकृत कविकल्पद्रुम, ह्यांत धातूंची नामावळी आहे. प्रसाद नामक टीकेवरून, रामव्याकरण नांवाचा ग्रंथ वोपदेवाचाच असल्याचे कळते. वोपदेवकृत काव्यकामधेनु. ह्यांत सदरहू धातुनामावळीची व्याख्या आहे, व त्याजवर दुर्गादासाची धातुदीपिका नामक वृत्ति, आणि रामन्यायालंकारकृत कवि कल्पद्रुम व्याख्या नांवाची टीका आहे. राधाकृष्णकृत धातुरत्नावाल. हा पद्यात्मक ग्रंथ आहे. इलायुधकृत कविरहस्य. हे पद्यात्मक असून, त्यांत • सामान्य क्रियापदाची उदाहरणे दिली आहेत, व त्याजवर एक टीकाही आहे. पद्मनाभदत्तकृत सुपद्म नांवाचे व्याकरण, सुपद्मपरि शिष्ट, सुपद्मधातुपाठ, परिभाषा, उणादिवृत्ति, हीं बंगाल्यांतील कांहीं परगण्यांत चालतात. ह्यावर, | विष्णुमिश्राची सुपद्म मकरन्द नांवाची टीका - : आहे. याशिवाय, कंदर्पसिद्धान्त, काशीश्वर, श्री धरचक्रवर्ती, रामचन्द्र, इत्यादींच्या व्याख्या आहेत. काशश्वरीगण, व त्याजवरील राम. कांताची टीका, असे ह्या संबंधाचेच ग्रंथ होत. पुरुषोत्तमकृत रत्नमाला. हे व्याकरण असून, त्याचा प्रसार कामरूपांत आहे. भरतमल्लकृत दूतबाध. हे व्याकरण आहे, व ह्याच ग्रंथ काराची त्याजवर टीकाही आहे. परंतु ते फारसे उपयोगांत नाही.