Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

15 भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २४३ कातंत्रगणधातु नांवाच्या ग्रंथांत कातंत्रांतील धातू पद्धतशीर लाविले आहेत, व त्याजवर रमानाथकृत मनोरमा नांवाची टीका आहे. याशिवाय, रहसनन्दीकृत कातंत्रषट्कारक, शिवदासकृत कातंत्रउणादिवृत्ति, कातंत्रचतुष्टयप्रदीप, कातंत्रधातुघोषा, कातंत्रशब्दमाला, इत्यादि अनेक ग्रंथ कातंत्रसंबं धाचेच आहेत. दुर्गसिंहकृत दुर्गासिंही. ही कातंत्रावर टीका आहे. त थापि, हिचा कर्ता दुर्गसिंह नसून, सर्ववर्मा असल्याचे कळते. मात्र, दुर्गसिंहाची कातंत्रवृत्तिटीका आहे. बोपदेवकृत कामधेनूवरून असे समजते की, दुर्गगुप्ताची दुर्गटीका आणि वर्धमानमि श्राचा कातंत्रविस्तारे नांवाचाही ग्रंथ आहे. क्रमदीश्वरकृत संक्षिप्तसार नांवाचा व्याकरण ग्रंथ बंगा त्यांत प्रचारात आहे. मात्र, तो कित्येक ठिकाणी जुमरनंदीने शुद्ध करून, त्याला त्याने जौमर असे नामधेय दिले आहे. त्याजवर गोपीचंद्राची टीका असून, त्या टीकेवर व्याकारदीपिका नामक न्यायपंचाननाची आणि दुसरी एक वंशवादनाची वृत्ति आहे. ह्याखेरीज, संक्षिप्तसार, दुर्घटघटन, शब्द. घोषा, धातुघोषा, दुर्गादासकृत सुबोधिनी, मिश्रकृत छाट, वगैर टीका, व रामानंद, रामतर्कवागीश, मधुसूदन, देवीदास, रामभद्र, रामप्रसादतर्कवागीश, श्रीवल्लभाचार्य, दयाराम, वाचस्पति, भोलानाथ, कार्तिकासिद्धान्त, रतिकंठतर्कवागीश, गोविंदराम, इत्यादींच्या व्याख्या आहेत.