Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४२ भाषाशास्त्र...... हेमचन्द्र अथवा हेमसूरीकृत हैमव्याकरण. शब्दानुशा सनावर लघुवृत्ति नांवाची जी टीका आहे, ती । | ह्याचीच असल्याचे दिसते. हिचे आठ अध्याय आहेत, व शेवटल्या अध्यायांत प्राकृत भाषेतील अनियमित शब्दांचे निरूपण केले आहे. हेमचं द्राच्या व्याकरणावर एक टीकाही आहे. अभिनव शाकटायनकृत शब्दानुशासन. यांत शब्द विवेचन आहे. वररुचिकृत प्राकृतचन्द्रिका. हीत संस्कृतापासून प्राकृत बनलेल्या शब्दांचे निरूपण आहे; व प्राकृत मनो रमा नांवाची तिच्यावर टीकाही आहे. कातंत्र. ह्यालाच कलाप अशी सुद्धा संज्ञा आहे. ह्या व्याकरणाचा बंगाल्यांत फार प्रसार असून, ह्यांतील सूत्रे कुमार देंचाकडून प्राप्त झाल्याविषयी आख्यायिका आहे. ह्यावर त्रिलोचनदासकृत कातंत्रपंजिका, रघुनंदन आचार्यशिरोमणिकृत कलापतवार्णव, कातंत्रचन्द्रिका, वररुचिकृत चैत्रकुटी, हरिरामचक्रवातंकृत व्याख्यासार, रामदासकृत व्याख्यासार, इत्यादि व्याख्या, आणि सुषेण, कविराज, रमानाथ, उमापात, कुलचन्द्र, व मुरारि, यांच्या देखील टीका आहेत. श्रीमतदत्ताचे कातन्त्रपरिशिष्ट नांवांचेही दुसरे एक परिशिष्टादाखल पुस्तक आहे, व त्याजवर गोपिनाथकृत परिशिष्टप्रबोध, आाणि शिवरामचक्रवर्तीकृत परिशिष्टसिद्धांतरत्नाकर, नांवाची टीका आहे.