पान:भाषाशास्त्र.djvu/248

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २४१ माधवाचार्यकृत माधवीयवृत्ति. हा धातू व तद्वितप्रत्य यावरील व्याख्या होय, व ती सायणाचार्याने केली । आहे. ह्या वृत्तीत सायणाचार्याने जे वैयाकरण व ग्रंथ आधारभूत म्हणून मानले आहेत, त्यांची नावे खाली लिहिल्याप्रमाणे होत. चन्द्र, आपिशलि, शाकटायन, आत्रेय, धनपाल, कौशिक, पुरुषकार, सुधाकर, मधुसूदन, यादव, भागुरि, श्रीभद्र, शिवदेव, रामदेवमिश्र, देव, नंदि, राम, भीम, भोज, हेलाराज, सुभूतिचन्द्र, पूर्णचन्द्र, यज्ञनारायण, कण्व, स्वामी, केशवस्वामी, शिवस्वामी, धूर्तस्वामी, क्षीरस्वामी, तरंगिणी, आभरण, शाब्दिकाभरण, समन्ता, प्रक्रियारत्न, आणि प्रतीप. पाणिनीकृत शिक्षा. हा उच्चारविषयक ग्रंथ आहे, व त्यांत । विशेषतः वेदांत आढळणा-या शब्दोच्चाराचे निरू पण आहे. अनुभूतिस्वरूपाचार्यकृत सरस्वति प्रक्रिया. हा व्या करण ग्रंथ असून, तो सरस्वतीच्या प्रसादाने तयार झाला असल्याविषयी ग्रंथकाराचे म्हणणे आहे. सुमारे सातशे सूत्रांवर ह्या ग्रंथाची रचना झाली आहे, असे म्हणतात. उत्तर हिंदस्थानांत ह्या व्याकरणाचा विशेषेकरून प्रचार आहे. ह्यावर पुंजराज आणि महीभट्ट यांच वृत्ति असून, ह्याखेरीज सिद्धान्तचेद्रिका व पदचन्द्रिका नांवाच्याही व्याख्या आहेत. १ हे व या मागून सांगितलेले इतर वैयाकरण पाणिनीच्या पद्ध. तीस अनुसरूनच नसल्यामुळे, त्यांचे निराळेच विवेचन केले आहे