२४० भाषाशास्त्र. कारिका. हीत महाभाष्य, काशिकावृत्ति, इत्यादींत जे व्याकरणाचे नियम दिले आहेत, त्यांचे विवेचन आहे. पारिभाषा. हात वार्तिकें, भाष्य, पाणिनीची सूत्रे, व पुराणवैयाकरण, यांच्यांतील पारिभाषिक शब्दांचा व्याख्या आहे. भर्तृहरिकृत वाक्यप्रदीप. ह्यालाच हरिकारिका असेही नामधेय असून, त्यांत कारकप्रक्रिया अथवा वाक्यरचनेचा विचार केला आहे. कोंडभट्टकृत वैयाकरणभूषण. हरिवल्लभकृत भूषणदर्पण. ही वैयाकरण भूषणावर टीका आहे, व वैयाकरणभूषणसार हा त्याचा सारांश आहे. नागेश भट्टकृत वैयाकरणसिद्धान्तमंजूषा व लघुपैयाकरण सिद्धान्तमंजुषा. हे वाक्यप्रदीपासारखेच ग्रंथ आहेत. आणि ले० वै० क० सिद्दान्तावर वैद्यनाथ पायगुंडाची कला नांवाची टीका आहे. गणपाठ. ही व्याकरणांत आलेल्या नियमांतील शब्दाची यादी होय. गणरत्नमहोदधि. ही सदरहू शब्दावलीवरील व्याख्या आहे. भट्टीकाव्य. ह्यांत क्रियापदाची रूपे तपशिलाने सांग तली आहेत, व ह्याजवर अनेक टीका झाल्या आहेत. यङ्ग्लुङान्तशिरोमणि. यांत यङ्लुङान्ताचे विवेचन आहे. मैत्रेयरक्षितकृत धातुप्रदीप अथवा तंत्रपदीप. ही पाणि नीने केलेल्या धातुपाठावरील व्याख्या आहे.
पान:भाषाशास्त्र.djvu/247
Appearance