पान:भाषाशास्त्र.djvu/246

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २३९ रामचन्द्र आचार्यकृत प्रक्रियाकौमुदी. हे व्याकरण असून, त्यांत पाणिनांचे नियम पाळले आहेत. परंतु त्याच्या एकंदर रचनेत आणि व्यवस्थेत पु ष्कळ फेरबदल केला आहे. विठ्ठल आचार्य. यांची प्रसाद नांवाची प्रक्रियाकौमुदीवर टीका आहे. जयन्तकृत तत्वचन्द्र. ही देखील प्रक्रियाकौमुदीवर टीका असून, ती कृष्ण पंडिताने केलेल्या टीकेचे सार आहे, ज्ञानेन्द्रसरस्वति. ह्याची तत्वबोधिनी नांवाची सिद्धान्त कौमुदीवर टीका आहे. हरिदीक्षित कृत शब्दरत्न. ही भट्टोजी दक्षताच्या | मनोरमेवरील टीका आहे. लघुशब्दरत्न हा याचाच सारांश आहे. बालभट्ट ऊर्फ वैद्यनाथपायगुंडकृत भावप्रकाश. ही हरिदीक्षितांच्या टीकेवर व्याख्या आहे. लघुभूषणकान्तिनामक व्याकरणसारावरील टीका व परिभाषेदु शेखरकाशिका नांवाची वृत्तिदेखील ह्याचीच आहे. शीरदेवकृत परिभाषावृत्ति. ही भाष्य व वार्तिकें यांच्या परिभाषेवर टीका आहे. भास्कर भट्टकृत लघुपरिभाषावृत्ति, आणि परिभाषार्थ | संग्रह. स्वयंप्रकाशानन्दकृत चन्द्रिक'. ही लघु परिभाषावृत्तीवर टीका आहे. त्याचप्रमाणें परिभाषार्थसंग्रह ही देखील तशीच दुसरी टीका आहे.