पान:भाषाशास्त्र.djvu/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ भाषाशास्त्र , याप्रमाणे, फक्त ठळक ठळक वैयाकरणांचेच सामान्य दिग्दर्शन झाले. तथापि, ह्या अगाध संस्कृत महोदधीत, ज्यांनी ज्यांनी म्हणून भाषाशास्त्रावर थोडेबहुत तरी परिश्रम केले आहेत, अशी आणखीही अनेक रत्ने आहेत. सबब, वाचकाच्या माहितीसाठी, त्यांची व त्यांच्या कृतींची केवळ त्रोटकच हकीकत येथे देतो. ईश्वरानन्द. ह्याने कैयटाच्या महाभाष्यप्रदीपावर टीका केली असून, तिचे नांव भाष्यप्रदीपविवरण आहे. जिनेन्द्र. ह्याची न्यास नांवाची कृति सुविश्रुत आहे, व |हिलाच काशिका वृत्तिपंजिका म्हणतात. ही पाणि | नीवरील वृत्त आहे. रक्षित. ह्याची जिनेंद्राच्या न्यास ग्रंथावर टीका आहे. नागोजी भट्टकृत वृत्तिसंग्रह. ही पाणिनीवरील संक्षिप्त | टीका आहे. पुरुषोत्तमदेव. ह्याची भाषावृत्ति नांवाची पाणिनीवरील टीका आहे. मात्र, हींत वेदभाषेचे नियम गाळाऊ केले आहेत. सृष्टिधर. ह्याची पुरुषोत्तमदेवाच्या वृत्तीवर भाषावृत्ति नांवाची टीका आहे. भट्टोजी दीक्षितकृत शब्दकौस्तुभ. ही पाणिनीवरील अपुरी राहिलेली वृत्ति होय. मनोरमा अथवा प्रौढ मनोरमा ही सुद्धा ह्याचीच कृति आहे. वैद्यनाथ पायगुंड उर्फ बाळंभट्टकृत प्रभा. ही शब्द कौस्तुभावरील टीका होय. चिदस्थिमाला ही लघुशब्देन्दुशेखरावरील यानेच केलेली टीका आहे.