पान:भाषाशास्त्र.djvu/244

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २३७ स्वरूपाचार्यकृत सारस्वत, हे १८६१ साली प्रसिद्ध झालें. शर्ववम्याचा कातंत्र नांवाचा एक ग्रंथ आहे, आणि त्याजवर दुर्गसिंहाची टीका आहे. ह्यांत व काच्छायनकृत पालीव्याकरणांत विशेष साम्य दृग्गोचर होते, व त्यामुळेच त्याचे विशेष महत्व वाटते. बुल्हरच्या लेखावरून असे दिसते की, काश्मीरांत ह्या कातंत्र व्याकरणाचाच विशेष उपयोग करितात; आणि त्या योगाने त्याजवर, इ. स. बाराव्या, तेराव्या, चौदाव्या, पंधराव्या, व सोळाव्या शतकांत, बच्याच टीका झाल्या आहेत. ह्या खेरीज, व्याडिकृतं परिभाषा, चन्द्रकृत वर्णसूत्र, परिभाषा, आणि षड्भाषाचन्द्रिका, क्षीरकृत अव्ययवृत्ति व धातुतरंगिणी, वररुचिकृते प्राकृतप्रकाश, भामहकृत मनोरमावृत्ति, प्राकृतकामधेनु, प्राकृत लंकेश्वर, हेमचन्द्रकृत मागधीव्याकरण, ह्याच हेमचन्द्राचे शब्दानुशासन, तसेच चन्द्रव्याकरणसूत्र, कलापसूत्र, सरस्वतीव्याकरणसूत्र, इत्यादि सर्व परिशीलन करण्यायोग्य ग्रंथ आहेत. १ ऋक प्रतिशाख्यांत कोणी एका व्याडचें नांव आहे. सबब, तोच हा असण्याचा संभव आहे. ह्याचेच नांव दाक्षायण असून, एक लक्ष ( १००००० ) श्लोकांचा संग्रह " नांवाचा ग्रंथ ह्याचाच असेल, असे वाटते. पाणिनीला दाक्षिपुत्र अशी ही संज्ञा होती. त्यामुळे, ह्या व्याडीचाच पाणिनी वंशज असावा, असे गोल्डस्टकरचे ह्मणणे आहे. २ इ. स. पूर्वी ५६ वर्षे. ३ ह्याचा काल इ. स. १०८८ पासून ११७२ पर्यंत असावा, असे डा. भाऊ दाजचे मत आहे. (J. B. R. A S. IX. 224.) हा जैनधर्मी असे. • संस्कृत व्याकरणांची एकंदर यादी कोलबूकने दिली आहे. ( Miscellaneous Essays. II. 38. )