Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इ भाषाविषयक, आर्य ३ पौरस्त्य प्रयत्न. २३३ तेव्हांच नवीन ओळख होऊन, परस्पर परिचय होत चालला, असेही ते प्रतिपादन करितात. इतकेच नव्हे तर, ह्या परिचयामुळेच यवन शब्दांशी आमचे संचट्टण होऊन, तदनंतरच पाणिनीने हा शब्द आपल्या अष्टाध्यायींत वापरला; आणि ह्या यवन शब्दाचा उल्लेख झाल्या कारणानेच त्याचा काळ इ. स. ३५० वर्षाच्या सुमारास असावा, असे ते ह्मणतात. परंतु, शिकंदराची स्वारी तर इ. स. पूर्वी ३२७ व्या वर्षीच हिंदुस्थानावर झाली होती. तेव्हां ह्या पाव शतकाच्या अंतराचे निवारण कशा प्रकारे व्हावे, हे समजत नाही. शिवाय, पाश्चात्य पंडितांतही पाणिनीच्या कालासंबंधाने पुष्कळ मतभेद आहे. त्यामुळे, कशास कांहींच मेळ असल्याचे दिसत नाहीं. सबब, ही वस्तुस्थिति मनांत आणून, एकंदर गोष्टींचा सर्व बाजूंनी विचार केला ह्मणजे, पाणिनीचा पाश्चात्यांनी ठरविलेला काळ स्वीकृत करण्यास मोठी अडचण वाटते. असो. पाणिनीचा काल इ. स. पूर्वी २४०० वर्षे अस ल्याविषयी, पंडित सत्यव्रतेसामश्रमीनें यास्क व शाकटा निश्चित केले असून, त्याच्याही पूर्वीच यनाचा कल. यास्क आहे, याविषयी अगदीच संशय नाहीं. इतकेच नव्हे तर, ता पाणिनीपेक्षां निदान दोनशे वर्षांनी तरी पुराणतर असावा, असे अंतःप्रमाणा 9 * Scholars are not agreed as to the periods when Yáska and Pánini respectively lived, or even as to which of the two was the more ancient. » ( Muir's Sanskrit Texts. vol. II. P. 153. 1871 ). २ निरुक्त, उपोद्घात पु. ६ वें. ७ जि-झि.