२३४ भाषाशास्त्र, वरून दिसून येते. ह्या दोघां वैयाकरणांहूनही, शाकटायन हा प्राचीनतर होय; आणि त्या दोहोंत जें कालमानाचे अंतर आहे, तेच यास्क व शाकटायन यांत देखील असावे, असे अनुमान होते. पाणिनीवर कात्यायनाची वृत्ति असून, त्याचा काल पाणिनी, कात्या- इ. स. पूर्वी १२०० वर्षे असल्या यन, व पतंजलि, या विषयी कांहींचे मत आहे. तथापि, हा जवरील टीका. ऋषि इ. स. पूर्वी ३५० वर्षाच्या सुमारासच झाला असावा, असेही कित्येक म्हणतात. कायायनाने विशेषेकरून, पाणिनीचे मत खोडून टाकून, आपलेच स्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. परंतु, पतंजलीने त्यांत अनेक दोष काढून, त्याचे खंडन व पाणिनीच्या मताचे मंडन केले आहे. कात्यायनाच्या पाणिनीवरील टीकेला कात्यायनवृत्त म्हणतात; व पतंजलीच्या टीकेला महाभाष्य अशी संज्ञा आहे. पतंजलीचा काल इ. स. पूर्वी १४० पासून १२० वर्षांपर्यंत असावा, असा गोल्डस्टकरचा अभिप्राय आहे. तो भरतखंडाच्या पूर्वेस गोनई येथे जन्मला असून, तो कांहीं कालपर्यंत काश्मीर येथे होता, व त्याच्या आईचे नांव गोणिका असल्याचे सांगतात. पाणिनि, कात्यायन, आणि पतंजली नंतर, सुमारे एकशे पन्नास लहान मोठे वैयाकरण दुसरे लहान मोठे । जाट व वृत्तिकार होऊन गेले. ह्यापैकीं, विशेष नामांकित ह्मटले ह्मणजे, कैयट, नागोजीभट्ट, वामन, भट्टोजी दीक्षित, वरदराज, वैयाकरण,
पान:भाषाशास्त्र.djvu/241
Appearance