पान:भाषाशास्त्र.djvu/238

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

17 ( 5 ) - ८ , भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २३१ शैलेश्वर किंवा पर्वतेश्वर या नामधेयांनीही त्याला हाक मारण्याचा परिपाठ असे. आणि ही सर्व नांवें आर्यकुटुंबद्योतकच आहेत, हे विशेष रीतीने सांगण्याची अवश्यकता नाही. परंतु, ह्या खेरीज आणखीही एक गोष्ट अत्यन्त महत्वाची आहे, व त्यावरून मलयकेतूच्या आर्यत्वासंबंधी एकंदर शंकेचे तत्काल निरसन होण्यासारखे आहे. कारण, आपला बाप वारल्याला दहा महिने झाले तरी, आपण त्याच्या नांवाने तिळांजळी देखील दिला नाही, असे मनांत येऊन, त्याने ( मलयकेतूनें ) मोठ्या दुःखाचा उच्छ्वास टाकला आहे. , मलयकेतुः । निःश्वस्यात्मगतम् । अद्य दशमोमासस्तातस्योपरतस्य न चास्माभिथापुरुषाभिमानमुद्रहदूभिस्तमुद्दिश्यतयांजलिरप्यावर्जितः । ( अंक ४ था पहा.) | ह्यावरून, मलयकेतु हा यवन किंवा म्लेच्छ नसून, तो आर्यवंशजच होता, याबद्दल काडीमात्रही शंका राहत नाहीं. कारण, ही श्राद्धक्रिया, अथवा हा तिलांजलीचा विधि, हिंदूशिवाय अन्य कोणत्याही जातींत नाहीं; आणि म्लेच्छांत तर तो स्वप्नांत देखील आणावयास नको. तेव्हां अर्थातच मलयकेतूला जे म्लेच्छ झटले, ते निव्वळ अवहेलनार्थच होय, हे आणखी विशेष रीतीने व्यक्त करावयास नलगे, तात्पर्य, यवन किंवा म्लेच्छ शब्दाचा उपयोग, आमचे तापयर्थ, व म्ले- पूर्वज, व प्राक्कालीन पंडित, आणि च्छ शब्दाचे अनेक अन्य कविगण, हे सदर्ह शब्द केउपयोग, वळ ग्रीक अगर मुसलमान लोकांचेच