Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३० भाषाशास्त्र.. । शिवाय, तिरस्कार अथवा अवहेलना व्यक्त करण्यासाठी सुद्धां, ह्या शब्दांची योजना केली म्लेच्छ . शब्दाचा असल्याचे आढळून येते. सबब, ही अवहेलनार्थ उपयोग. गोष्ट मोठी मुद्याची असल्याकारणाने, विशेष रीतीने ध्यानात ठेवण्यासारखी आहे. उदाहरणार्थ, मुद्राराक्षसांत, राक्षसाने मलयकेतला केवळ अवधीरणार्थच म्लेच्छ म्हटले आहे, असे त्यांतील संदर्भावरून वाचकाच्या सहज लक्षात येईल. आतां, कोणी कदाचित् अशी शंका घेईल की, मलय • त्याचे प्रमाण. | केतु हा म्लेच्छ किंवा यवन असेल, आणि त्यामुळेच, त्याला म्लेच्छ हे उपपद लाविले असावे. परंतु, ही आशंका अगदींच निरर्थक ठरते. कारण, एकतर मलयकेतु हे हिंदुवाचक म्हणजे अर्थात् आर्यवाचक नांव आहे; व दुसरे असे की, ह्या नावाने म्लेच्छत्व व्यक्त होणे शक्यच दिसत नाही. तथापि, ह्या प्रतिपादनावरही कोणी कदाचित् अशी कोटी लढवाल कीं, मुद्राराक्षस हे संस्कृत नाटक असल्यामुळे, म्लेच्छ नामधेयास संस्कृत रूप देऊन, ते नांव संस्कृत नाटकास शोभे असे बनविले असावे. पण, ही शंका देखील निराधारच भासते. कारण, केवळ एकट्या मलयकेतूचेच नांव आर्यवाचक आहे, असे नाही. तर त्याच्या चुलत्याचे नांवही विरोचक, म्हणजे आर्यबीजसंज्ञकच आहे. फार तर काय सांगावे पण, त्याच्या बापाचे नांवसुद्धा त्याच मास, ल्याचे आहे. ह्याला मुख्यत्वेकरून पर्वतकच म्हणत. तथापि १ अहो विवेकशून्यता म्लेच्छस्य । (मुद्राराक्षस. अंकवा.)