पान:भाषाशास्त्र.djvu/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २२९ शब्दासंबंधी त्यांचे कशा प्रकारचे मत आहे, याविषयी यथावकाश विचार करूं. मॅक्समुलरची असा अभिप्राय आहे की, यवन शब्द केवळ ग्रीक किंवा आयोनियन् लोत्याची पाश्चात्याझी केलेली मीमांसा काचाच वाचक नसून, तो पुष्कळ व्यापक आहे. लॉसन्च्या मताप्रमाणे देखील, यवन शब्दाचा गर्भितार्थ विशेष विसृत आहे; व त्यांत हीब्यू, अरब, इत्यादि लोकांचा समावेश होत असून, ही गोष्ट त्याने सिद्धच केली आहे, असे मक्समुलर लिहितो. गोल्डस्टकरचे' असे ह्मणणे आहे की, पाणिनीने ज्या यावनानी शब्दाचा उपयोग केला, तो शब्द इराणी सांकेतिक चिन्हाचाच वाचक होय; आणि त्याबरून, यवन व म्लेच्छ, अथवा ग्रीक आणि मुसलमान, यांचा कोणत्याही प्रकारे बोध होत नाही, असा त्यांच्या लिहिण्याचा मथितार्थ दिसतो. असो. म्लेच्छ शब्दसुद्धा यवन शब्दाप्रमाणेच पुष्कळ व्यापक असल्याचे दृग्गोचर होते. न्लेच्छ व यवन है इतकेच नव्हे तर, हे दोन्ही शब्द पर्यायशब्द. | एकाच अर्थाचे वाचक असल्याचे वैयाकरणांच्या लेखावरूनही नजरेत येते. कारण, यवन व स्लेच्छ हे केवळ पयाय शब्दच आहेत, असे व्यक्त करण्यासाठी, उज्ज्वलदत्ताने देखील * यवनो म्लेच्छ विशेषः ।' असे आपल्या उणादि सूत्रवृत्तींत सांगितले आहे. 9 Max Muller's Ancient Sanskrit Literature. P. 501. २ गोल्डस्टकरचा पाणिनीवरील लेख पहा. ( पा. १७. ) ।