Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२८ भाषाशास्त्र. | सरदह दोन शब्दांपैकी आपण अगोदर यवन शब्द यवन शब्दाचा पो- घेऊ, आणि त्यासंबंधाने आमचे पौरस्त्य मताप्रमाणे वि- रस्त्य पंडित काय म्हणतात, स्मृतिसृत अर्थ. । कारांचा त्याबद्दल कसा अभिप्राय आहे, व त्याच्या व्युत्पत्तीविषयीं वैयाकरण कशा त-हेची मीमांसा करतात, हे काळजीपूर्वक पाहूं. आमचे भारतीय विद्वान, हा यवन शब्द बराच व्यापक असल्याचे समजतात, आणि यवन म्हणजे पारदेशिक किंवा वर्णसंकर होऊन झालेली प्रजा, असेही ते मानतात. स्मृतिकारांच्या मते, शुद्र पुरुष व क्षत्रिय स्त्री यांच्या जोडप्यापासन झालेली संतती यवन समजावयाची. आणि वैया करणांच्या अभिप्रायाप्रमाणे, यवन शब्द हा, यु=भिश्रण या धातूपासून झाला आहे; तेव्हां अर्थात्च, ह्या अभिप्रायाने स्मृतिकारांच्या मतास पष्कळच पुष्टीकरण मिळते से दिसते. कारण, यवन म्हणजे शूद्र व क्षत्रियांची मिश्रसंतति होय, असेच हे स्मृतिकार प्रतिपादन कारतात. शिवाय, यवन व म्लेच्छ हे केवळ पर्याय शब्दांप्रमाणेच वैयाकरण उपयोग करीत असल्याचेही त्यांच्या ग्रंथावरून व्यक्त होते. आतां, आपण क्षणभर पाश्चात्यांकडे वळू, आणि यवन १ उणादि सूत्रवृत्ति पहा. २ गौतम, ५, २१. ३ सुरुवृञो युच् ॥ ७४ ।। घुञ् अभिषवे। युमिश्रणे। रुशब्दे । वृञ्बरणे। एभ्यो युच्। ( उज्जलदत्तविरचिता उणादिसूत्रवृत्तिः । २. ७r). ४ यवनो म्लेच्छ विशेषः ।