पान:भाषाशास्त्र.djvu/225

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ भाषाशास्त्र. कूटरचना व ठकबाजीच समजतात. सबब, हे त्यांचे मत अगदीच अप्रशस्त असल्याकारणाने, वाचकास आगाऊ जागे करून त्यांस तसे निक्षन सांगणे आम्हांस केवळ भागच पडते. असो. आमच्या प्राचीन ग्रंथांस अर्वाचीनत्व आणत्यांस अर्वाचीनत्व ण्याचे कित्येक पाश्चात्यांचे काम आणण्याचा पाळ्यात्य इतके अन्यायाने, परंतु राजरोस आणि प्रयत्न. निर्भयपणे चालले आहे , तत्संबंधी त्यांस कोणत्याही प्रकारचा विधिनि ध न वाटतां, ते निःशंकपणे असे म्हणतात की, अमुक एक लेखाला अर्वाचीनत्व येण्यासारखे असेल तरच बरे होईल; अथवा, अमुक लेखाला अर्वाचीन काळांत ढकलतां आलें, तरच आमच्या मनाचे समाधान होईल ! आणि यासंबंधानेही विशेष आश्चर्य हे की, प्रोफेसर मॉक्समुलर सारखे पंडिताग्रणी म्हणविणारे देखील अशा प्रकारचे अविचाराचे लेख लिहन, ते सर्रास्त जगापुढे मांडतात. ह्या निरर्गल लेखांचे खरे स्वरूप कसे आहे ते समज ण्यासाठी, व त्यांचा शोचनीय परिपाश्चात्य पंडितांचे निरर्गल लेख. णाम आमच्या पुराणतम वाङ्मयावर होऊ नये एतदर्थ, तसेच आमच्या प्रियं| १ मॉक्समुलर म्हणतो,

  • We must take Indian literature as it is, and try to make the best of it. And in doing this, we must, as much as possible, divest ourselves of the idea that Hindu writers always wish to impose upon

us, and to make every thing as old as possible. ( India What can it teach us ? P. 356, 1883) ( भारतीय साम्राज्य पु. २ रे पान १०४ ते ११५ पहा.) :