Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ भाषाशास्त्र रुचि, इत्यादि बाबतींत पाश्चात्य पंडित आणि अनेक भाषाकोविंद यांचे कसे मत आहे ते पाहूं, व त्याचे विहंगमदृष्ट्या किंचित् निरीक्षण करूं. म्हणजे त्यावरून, आम च्या पूर्वजांनी आपल्या इतिकर्तव्यतेची बजावणी किती अंशाने केली; ती करतांना, केवळ निरपेक्षबुद्धीनेच त्यांनी आपले शरीर कसे कष्टविले; आणि फक्त शास्त्रान्वेषणार्थच त्यांनी आपला देह कशा त-हेने झिजविला; याचे सहर्जी दिग्दर्शन होईल. संस्कृत भाषेच्या इतिहासांत निरुक्ताचे विवेचन कर तांना, वेबरने असे म्हटले आहे की, वेबर. | भाषाशास्त्रासंबंधी हालचाल, व शव्दव्युत्पत्तिविषयक चळवळ, यास्काच्यावेळी फारच होती. इतकेच नव्हे तर, कौषीतकी ब्राह्मणांवरून देखील ह्या महत्वाच्या विषयाचा अभ्यास ब्राह्मण लोक मोठ्या उत्साहाने आणि प्रेमपूर्वक करीत, यांत संशय नाहीं. ( Weber's H. S. L. P.26. 1882. ) मॉक्समुलर म्हणतो की, निरुक्तांतील कित्येक ठिका णचे निरूपण व भाषाविषयक विवाद माक्समुलर. हे निःसंशय अतिमहत्वाचे असून, शब्दव्युत्पत्तीच्या कामांत त्यांचा फारच उपयोग आहे. आणि त्यावरूनच असे दिसते की, ज्यावेळी ग्रीसदेश अगदी बाल्यावस्थेत होता, व शब्दव्युत्पत्तिशास्त्राचा पहिला धडा देखील त्याने घेतला नव्हता, त्यावेळी, ह्याच भाषाशास्त्रविषयावर, भरतखंडांतील ब्राह्मण मोठ्या गांभीर्याने आणि फारच विचारपूर्वक ऊहापोह करीत. ( Muller's Ancient Sanskrit Literature. )