पान:भाषाशास्त्र.djvu/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. १९५ २ उत्तरषट्क. पूर्वषट्काचे सहा अध्याय असून, उत्तर षट्काचे आठ अध्याय केलेले आहेत; आणि ह्या सर्वांची वेदांगांतच गणना होते. पूर्वार्धाच्या पहिल्या अध्यायांत प्रस्तावना व उपोद्घातादाखल सामान्य विवेचन आहे. इतकेच नव्हे तर, तितक्याही पुरातनकाळीं, भाषाशास्त्रात्मक व शब्दव्युत्पत्तिविषयक अशी मुद्देसूत आणि महत्वाची मीमांसा देखील या समवेतच दृग्गोचर होते. शिवाय, ह्यांतच व्याकरणासंबंधही अवश्य ते दिग्दर्शन केले आहे. दुसन्या आणि तिस-या अध्यायांत निघंटुंत दिलेल्या वैदिक शब्दांचे विवरण केले आहे. परंतु, ह्यांत अपूर्तता अस. ल्याकारणाने, व्यक्त होत असलेली कमतरता दुर्गाने आणखी ज्यास्त व्याख्या देऊन भरून काढली आहे; व चवथ्या, पांचव्या, आणि सहाव्या अध्यायांत नैगमांचे, म्हणजे वेदांतील शब्दांचे विवेचन आहे. आतां, उत्तरार्धातील पहिल्या सहा अध्यायांत, वेदांतील अनेक देवतांची माहिती दिली आहे. मात्र, सातग आणि आठवा अध्याय प्रस्तुत विषयाला धरून असल्याचे फारसे दिसत नाहीं. तथापि, एकंदरीने पाहतां, व भाषाशास्त्र, शब्दव्युत्पत्ति, | पौराणिक ऐतीह्य, आणि दैवतपारंनिरकाचे महत्व. पर्य, इयादि दृष्टीने विचार करतां, हैं। निरुक्त खरोखर फारच महत्वाचे व विशेष उपयोगाचे आहे, यांत लेशभरही शंका नाही. कारण, ते आम्हांला आमच्या पूर्वजांचे बुद्धिप्रागल्भ्य दाखविते; त्यांची तीव्रमति व्यक्त करते; आणि आम्हांला सुद्धा त्याच प्रकारचे वळण लावून देते. इतकेच नव्हे तर, आमच्या सारखी विशेष