पान:भाषाशास्त्र.djvu/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ भाषाशास्त्र. पांच अध्याय आहेत. पहिल्या तीन निघंटूचे प्रकार. अध्यायांत नैगमपदांचे, म्हणजे वेदांतील २७८ निरनिराळ्या शब्दांचे वर्गीकरण आहे; आणि त्यांत पर्याय शब्द सुद्धा दिले आहेत. चौथ्या अध्यायांत वेदांतील कठीण शब्दांची नामावळी आहे; व पांचव्यात भिन्न भिन्न देवताची नावे सांगून, त्यांचे वर्गीकरण केले आहे. याखेरीज अथर्वसंहितेचा निघंटु आणि शुक्लयजुर्वेदांचे निगमपरिशिष्ट, हे ग्रंथही उपलब्ध असल्याचे कळते. आह्मीं पूर्वी सांगितलेच आहे, व ते वाचकांच्या | निरुक्त. ध्यानांतही असेल की, आमचे पुराण वेद जसजसे जुने होत चालले, तसतशी त्यांची भाषा कठिणशी वाटू लागली; आणि त्यांजला सुलभता प्राप्त व्हावी म्हणून, निघंटुसारखे ग्रंथ मुद्दाम पंडितांकडून तयार करविले. परंतु, कालान्तराने असा कांहीं योग आला की, वेदांचे दुर्बोधत्व नाहीसे करण्यासाठी ज्या निघंटूची कल्पना झाली, त्यांचाच अर्थ सामान्य जनांस देखील समजेनासा होऊन, अर्थबोधाच्या संबंधाने मोठी पंचाईत पडू लागली. तेव्हां अर्थातच, टीकाकारांच्या साहाय्याची अपेक्षा पुनश्च दिसून आली. परंतु, यास्काने हे महत्वाचे कृत्य मोठ्या नेटानें हाती घेऊन, ती सर्वांशी भासमान होत असलेली अडचण ब-याच प्रमाणाने दूर केली. सबब, ह्या भाषातत्वज्ञाचे केवळ कृतज्ञतापूर्वक आपण फारच आभार मानले पाहिजेत. ही यास्काची कृति ह्मटली ह्मणजे, त्याचे सुप्रसिद्ध | निरुक्त होय. ह्याचे दोन भाग पाडत्याचे कर्ते यास्क. लेले आहेत. १ पूर्वषट्क, आणि