Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. १९३ पुढे, हजारों वर्षे लोटल्यावर, नवीन पिढीला त्या प्राक्कालीन वेदऋचांचें दुबधत्व भासू लागले. तेव्हां, उघडच, मुखाने उच्चारलेले मंत्र, आणि हातांनी घडलेली यज्ञक्रिया, ह्यांत कांहीं तरी मेळ आहे की नाही, याविषयी आमच्या तत्कालीन पूर्वजांचें मन कालान्तराने सहजींच साशंक होऊ लागले. त्यामुळे, मूळमंत्रांच्या अर्थाचे अवबोधन व्हावें एतदर्थ, त्यांनी वैयाकरण, नैयायिक, तत्ववेत्ते, शास्त्री, आणि पंडित, यांजकडे हे महत्वाचे काम सोपविण्याची योजना केली; व त्यांजकडून, अनेक पर्यायशब्दांचा एक ग्रंथ तयार करविला. तदनन्तर, हे तुल्यार्थशब्द एके ठिकाणी ग्रथित होऊन, त्यांचा एक कोशच बनल्याकारणाने, त्याला निग्रंथु अशी संज्ञा पडली. पुढे, ह्याचाच निघंटु असा अपभ्रंश झाला, आणि ज्या विद्वज्जनांनी हा कोश तयार केला, त्यांजला नैघंटुक ह्मणू लागले. हे नैघंटक किंवा निघंटुकार बरच होऊन गेले असावे, | असे दिसते. कारण, यास्कांनी देखील, पूर्वीचे निघंटुकार. वेदार्थप्रकाशक ह्मणून, सुमारे सतराजणांची नांवें दिली आहेत. ही खालीं लिहिल्याप्रमाणे होतः-- १ अग्रायण, २ औदुंबरायण, ३ और्णनाभ, ४ काय, ६ कौत्स, ६ क्रोष्टुकिं, ७ गाग्र्य, ८ गालव, अमेशिरस, १० तैटीकि, ११ वाष्र्यायणि, १२ शतबलाक्ष, १३ मौद्गल्य, १४ शाकटायन, १९ शाकपूणि, १६ शाकल्य, आणि १७ स्थौलाष्ठीवि. निघंटचा एक ग्रंथ सांप्रत उपलब्ध असून, त्याचे 66