१९२। भाषाशास्त्र । असो, प्रातिशाख्यानन्तर शब्दमीमांसाविषयक असा आयचा दुसरा अतिप्राचीन व महनिघंटु. | वाचा ग्रंथ निघंटु होय. ह्याचा मूळइतिहास जरा ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. सबब, त्याची थोडीशी हकीकत येथे देतो. आमचे वेदकालीन ऋषी मोठे शीघ्र कवी असून, यज्ञयागादि क्रियांत तर ते फारच तत्पर असत. त्यामुळे, ते स्वतः ऋचा बनवीत, आणि त्यांत सांगितल्याप्रमाणें ईशस्तवन करीत. इतकेच नव्हे तर, ते नानाविध मंत्रही रचीत, व त्याप्रमाणे भिन्नभिन्न देवतांस निरनिराळे हविभाग देत. अर्थात्, ते जी जी कर्मे करीत, अगर जी जी वचने बोलत, अथवा जे जे शब्द उच्चारीत, ते ते सर्व समजून, आणि त्यांचा अर्थ ध्यानांत आणूनच एकंदर व्यवस्था लागे. त्याकारणाने, वाचा व क्रिया, बोलणे आणि चालणे, शब्द व अर्थ, यांत केव्हाही विपर्यास होण्याचा संभवच नसे. अशा प्रकारें, ह्या आदिकवींच्या कवनस्फूर्तीचा झरा जोपर्यंत एकसारखा वाहत होता; वेददुर्योधत्वामुळे जो पावेतों में कर्मकांड अव्याहत त्याची उत्पत्ति. चालत असे; जावत्कालपर्यंत ही यज्ञपरंपरा अबाधित होती; जोंवर ह्या सर्वांचे ऐतीह्य समाजाच्या हृत्पटीकेवर बिंबलेलें होते; आणि जोपर्यंत तत्कालीन संप्रदाय पूर्णत्वाने अस्तित्वात व प्रचारांत होता; तोपर्यंत शब्दाचा अर्थ, वाक्याचा हेतु, आणि मंत्राचे इंगित समजण्यासंबंधानें कोणत्याही तव्हेची अडचणच पडत नसे, व त्याकारणाने सर्व क्रिया अगदी सुरळीतच चालत.
पान:भाषाशास्त्र.djvu/199
Appearance