भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. १९१ व्यक्त होतात, हे वाचकाच्या लक्षांत सहज येण्यासारखे आहे. प्रातिशाख्याचा दुसरा मुख्य हेतु म्हटला म्हणजे, पदांवरून संहिता तयार करण्याचा असून, त्यामुळेच त्याचे अध्ययन करण्यांत विशेष महत्व मानीत. ऋक्प्रातिशाख्यावर उअटाची उत्तम टीका आहे. कृष्णयजुर्वेदांतील प्रातिशाख्यसूत्रांत, आतेय, कौडिन्य, भारद्वाज, वाल्मीकि, आग्निवेश्य, आग्नवेश्यायन, पौष्करसादि, इत्यादि सुमारे वीस वैय्याकरणांची नांवें दिली आहेत. त्यावरून, त्यावेळी भाषाशास्त्राचे अध्ययन फार झपाट्याने चालू होते, असे दिसते. शिवाय, शुक्लयजुर्वेदांतील प्रातिशाख्यांत सुद्ध, शाकटायन, शाकल्य, गाय, काश्यप, दाल्भ्य, जातुकर्य, शौनक, औपशिवि, काण्व, आणि माध्यंदिन, यांची नावे मधून मधून चमकतात. शुक्ल यजुर्वेद-प्रातिशाख्याच्या पहिल्या अध्यायांत, संज्ञा व परिभाषा, यासंबंधीं विवेचन असून, दुसन्या अध्यायांत स्वराबद्दलचे विवेचन आहे. तिसरा, चौथा, आणि पांचवा, यांत संस्कार विवेचन आहे; सहावा व सातवा क्रियापदांवरील स्वरासंबंधी आहे; आणि आठव्यांत स्वाध्यायाविषयींचे नियम सांगितले आहेत. अथर्व वेदाच्या प्रातिशाख्याला शौनकीयाचतुराध्यायिका असे नामधेय असल्याचे आह्मीं पूर्वी सांगितलेंच आहे. ह्या प्रातिशाख्यांत, विशेषतः व्याकरणविचार आहे, व त्यांत शाकटायन वगैरे अनेक वैय्याकरणांची नांवें दृग्गो चर होतात.
पान:भाषाशास्त्र.djvu/198
Appearance