Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

22. १९० . ० भाषाशास्त्र.19 त्यायन त्याने केले असल्याविषयी कल्पना आहे. ४ सामवेदाचें प्रातिशाख्य; ह्याला झुकतंत्र व्याकरण असे नामधेयं आहे. आणि ६ अथववेदप्रातिशाख्य; ह्यालाच शौनकीया चातुराध्यायिका अशी संज्ञा आहे. प्रातिशाख्य म्हणजे वेदांचे व्याकरणच होय, असे म्हणण्यास हरकत नाही. आणि त्यावरून, भाषाविषयक अन्वेषण, वेदमंत्रांचे सत्यावबोधन, शब्दांचा अर्थ, त्यांची मीमांसा, व त्यांची व्युत्पत्ति, इत्यादि संबंधार्ने फार प्राचीकाळीसुद्धा आमच्या आर्यपूर्वजांत विलक्षण जिज्ञासा उत्पन्न होऊन, त्यांचे कुतूहल बरेच जागृत झाल्याचे भासमान होते. कारण, प्रातिशाख्यासारख्या केवळ स्वतंत्र ग्रंथांतच ह्या बाबतीचे निरुपण आहे असे नाही. तर, कचित् प्रसंगी ब्राह्मणांत देखील शब्दव्युत्पत्तीचा अंकुर स्वयमेव दृष्टीस पडतो, असे म्हटले असतां चालेल. कृष्णयजुर्वेदांतील ऐन्द्रवायवग्रहबाह्मणांत, एके ठिकाणी खाली लिहिल्याप्रमाणे उल्लेख आहे. “वाग्वै पुराच्य व्याकृताऽवदत् । ते देवा इन्द्रमनुन्निमांनो वाचं व्याकुर्विति । सोऽब्रवीद्वरं तृणै । मह्यचैवैषवायवेसह गृह्याता इति । तस्मादैन्द्रवायवः सहगृह्यते । तामिन्द्रो मध्यतोवक्रम्य व्याकरोत् । तस्मादियं व्याकता वागुच्यते' इति । (६. ४.) । " ह्यावरून, वाचेची मीमांसा, तिची व्युत्पत्ति, तिचे व्याकरण, आणि तिचे स्पष्टीकरण, हीं येथे कशा रीतीने हे बर्नेल्ने इ. स. १८७९ सालीं मंगलोर येथे छापविले होते.