Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्यनामधेयाची सार्वत्रिक मुद्रा. १७५ याप्रमाणे, त्यांनी जो देश नवीन व्यापला, त्याला ते ऐर्या ह्मणत, असे झन्दअविष्टा म्हणून एया. जो त्यांचा धर्मग्रंथ आहे, त्यावरून व्यक्त होते. कालान्तराने, झरथुष्ट्रधर्म पश्चिमगामी होऊन, तो पर्शिया, इलिमाई, व मीडिया, येथे पसरला; व हे सर्व देश आर्य नांवानेच विकं लागले. पर्शियाला इराण किंवा आरिया, आणि मीडियाला आरिया ह्मणत, व मीडियन् लोकांस आरी हेच नामधेय असे. अत्रोपटीन हा मीडियाचा अगदी उत्तरेकडील भाग होय. पण ह्याला देखील आरियाना ह्मणत. इलिमाई मात्र ऐलमा नांवानें सुप्रसिद्ध असून, हे नांव ऐर्यमाचा केवळ अपभ्रंशच होय, हे उघड आहे. पारसकांचा राजा जो सुप्रसिद्ध डरायस् ह्याने सुद्धा आपल्यास आरिय व आरिय-चित्र आरिय. ( ( ह्मणजे आर्य व आर्यवंशज ) असे ह्मटले आहे. फार तर काय सांगावे पण, अहुरमझ ह्मणून जो पारसीकांचा परमेश्वर, त्याला देखील आयचाँ देवच झटले आहे; तसेच, अरिस्टाँटल्चा शिष्या जो युडिमाँस त्याने सुद्धा पारसकांच्या प्रांताला आरिया असेच नामधेय दिले आहे; आणि सासानी ( मसदनपूजक ) १ ह्या ऐलमाचेच ख्रिस्ती धर्मातील ईलम ( the Elam of Genesis ) झाले असावे, असे वाटते. ह्याची भिन्न भिन्न रूपें, निरनिराळ्या लिपीत व शिलालेखांत दृग्गोचर होतात. उदाहरणार्थ, ऐलान, ऐरान्, अनिलान्, व अनिरान्. २ शचिन्हात्मक शिलालेख पहा. 1 11 12 : 3 बिहिस्तून शिलालेख, व त्यांचें तुराणी भाषांतर पहा.