Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इ १६८ भाषाशास्त्र तर, समाजाच्या बाल्यावस्थेत तो प्रथमतःच व्यवहारांत आला असावा, असे कोणालाही कबूल केले पाहिजे. आणि ज्यापेक्षां ह्या शब्दाची प्रथमावस्था फक्त संस्कृतांतच दृग्गोचर होते, व त्याचे रूपान्तर मात्र शमी, तुराणी, सामुद्रिक, इत्यादि भाषांत आढळून येते, त्यापेक्षा संस्कृत रूपी आर्यनिर्झरापासूनच अन्य शाखांस जीवन मिळून, त्यांचा प्रवाह सुरू झाला असावा, असे मानण्यास बलवत्तर । कारण मिळते. | अव म्हणजे इच्छिणे, तोषविणे, इत्यादि अर्थाचा हा अवु, अस्सल संस्कृत शब्द असून, त्याचा तामील भाषेत अवा(=इच्छा ) असा अपभ्रंश होतो, आणि त्याचेच शमो ( हीब्यू ) भाषेत अव्वा हे रूप झाल्याचे दिसते. फल् म्हणजे फलास येणे, हा मूळ संस्कृत शब्दच आहे. | फल, व ह्याचा परु (=पिकणे, फलद्रूपहोणे,) असा तामिल भाषेत अपभ्रंश होतो. त्याचप्रमाणे, हीब्यु० पारा=फूल येणे, पेरी=फळ, अनी० पर्क=फळ; फारसी० बर=फळ; इत्यादि भाषांतही त्याचा कालदेशानुरूप अपभ्रंश झाला आहे. । संस्कृत शण म्हणजे पोते, हा शब्द तर, मुख्य मुख्य शाण इत्यादि शब्द. सर्व आर्य व अनार्य, पौरस्त्य आणि पाश्चात्य भाषांत, थोड्याबहुत रूपांतराने दृग्गोचर होतो. तामिल ० शाकु. शमी ( हीब्यु ) सक. मल्याळी ० चाक्क, ग्रीक० साक्काम, साकोस. इंग्रजी संक. सेल्टिक ० संक. फिनी सक्की. मागीर० साक.