पान:भाषाशास्त्र.djvu/176

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६७ पांतर. भाषेचे उर्गमस्थान. साठी, तो हीब्रू ह्मणजे शमी भाषेत .अंबा शब्दाचे रू- कोणत्या रूपाने आढळतो, व तुराणी भाषेत त्याची रूषान्तरे कशी झाली आहेत, हे आपण लक्ष्यपूर्वक पाहूं. - अंबाचे द्राविडी भाषेत अम्मा असे रूप होऊन, हीब्रू ( शमी ) भाषेत ह्या शब्दाचें एम् व इम्म ( = आई ) असे रूपांतर झाले आहे. तसेच, शक (सिथियन ) भाषेत अम्माल, अम्मेइ, अम्मन; सीरियन० आमो; सामोयेडी अम्म; सिन्दी० अमा; मल्याळी ० अम; याप्रमाणे अन्य भाषांत देखील केवळ अपभ्रंशानेच ह्या मूळ ( अंबा ) शब्दाला कांही निराळे रूप प्राप्त झाल्याचे दिसते. आता, तुळ व तुडू नांवाच्या ज्या द्राविडी भाषेच्या शाखा आहेत, त्यांत अम्मा व अप्पा, या शब्दांच्या अर्थाचा परस्फर फेरबदल झाला असावा, असे वाटते. कारण, तुळु भाषेत अम्मे ह्मणजे बाप, आणि अप्पे ह्मणजे आई, असा अर्थ होतो; व तुडू भाषेत एन = बाप, अक = आई. या अर्थाचाच तो शब्द वाचक आहे. मोगली भाषेत देखील अम म्हणजे बापच होय. प्रायः, तिबेटी वगैरे भाषांत, ‘ए’ किंवा ‘पो', आणि 'म' अथवा 'मो' , हे लिंगवाचक प्रत्यय असल्याचे दिसते. ह्मणजे, पहिले पुरुषवाचक असून, दुसरे स्त्रीवाचक आहेत. उहाहरणार्थ ति० बोत्प ह्मणजे पुरुष, व ति० बोत्म ह्मणजे स्त्री होय. महाराष्ट्र भाषेतील आई शब्द हा अंबाचाच अपभ्रंश आहे, यांत तिळमात्रही शंका नाही. आतां, अम्बाल शब्द, संबंधवाचक आहे. इतकेच नव्हें