पान:भाषाशास्त्र.djvu/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ FY: भाषाशास्त्र. । एतद्विषयक विवेचन करतांना, मूर ह्मणतोः- * We dave docuen, cultuetter ave alse it or no, to look to Sanskrit for the oldest ectant forms ; and we do 272doubtedly, fund tlient there." ( MIuirs Sanskrit Texts. vol. II. P. 144 ). सरदहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता. ) तथापि, संस्कृत झणजे आर्य, ही सर्वांची मायभाषा | असून, ज्याप्रमाणे तिच्यापासूनच अन्य पुरावा. इन्द, पाली, महाराष्ट्र, ग्रीक, ल्याटिन्, जर्मन, इत्यादि आर्यभाषा प्रसवल्या, त्याचप्रमाणे शमी, तुराणी, सामुद्रिक, वगैरे भाषा सुद्धा ह्याच उद्गमस्थानापासून उद्भवल्या आहेत, असे मानण्यास आणखी एकादें बलवत्तर कारण किंवा जोराचा पुरावा असल्यास, तोही आपण यथावकाश पाहूं, आणि केवळ निःपक्षपाताने तपासू. वास्तविकपणे विचार केला तर आपणांस असे दिसून येईल की, भाषेतील शब्द हेच शब्दांचे अन्तर्गत तिच्या ख-या स्थितीचे आभ्यन्तर प्रमाण होत. आणि म्हणूनच, भाषेच्या उगमस्थानाचे ते निःसंशय द्योतक आहेत, असे म्हणण्यास बिलकूल हरकत नाही. सबब, ह्यांच्याच मुकाबल्याने आपण शमी, तुराणी, व सामुद्रिक, या भाषांतील शब्दांचे परिशीलन करूं, आणि त्यांचे उद्गमस्थान शोधून काढू. अम्बा ह्मणजे माता, हा मूळ संस्कृत शब्द होय. या