पान:भाषाशास्त्र.djvu/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. १४५ चीन भाषा, ह्या देखील सामुद्रिक भाषेपासूनच उद्भवल्या आहेत; इतकेच नव्हे तर, सामुद्रिक भाषेच्या परिशीलनानेंच भाषेचे एकंदर कार्य लक्षात येते, व तिची सामान्य रचना, तिची प्रवृत्ति, तिचा नियोग, आणि तिची गति, इत्यादि संबंधी ज्ञानही तदवलोकनानेच होते, अशी त्यांची कल्पना आहे. तात्पर्य, सामुद्रिक हीच मानवी प्राण्याची जन्मभाषा होय, असे डाक्तर रे' प्रभृति मानतात, यांत शंका नाही. तथापि, अशा प्रकारचे प्रतिपादन किती भ्रांतिमूलक व अज्ञानाचे आहे, हे कोणाच्याही लक्षांत सहज येण्यासारखे आहे. मग, मॉक्समुलर सारख्या विद्वान, बहु १ ह्याने प्रसिद्ध केलेल्या लेखांत जें मत प्रदर्शित केले आहे, त्यांतील उतारा मॅक्समुलरच्या ग्रंथांवरून, येथे थोडक्यांत देतो. तो म्हणतो, “ That all those tongues which we designate as the Indo-European languages have their true root and origin in the Polynesian language. ' 'I am certain, that this is the case as regards the Greek and Sanskrit :I find reason to believe it to be so, as to the Latin and other more modern tongues in short, as to all European languages, old and young.' • The second discovery which I believe I have made, and with which the former is connected, is that the study of the Polynesian language gives us the key to the original function of language itself, and to its whole mechanism. ( The Polynesicuat papers , By Dr. J. Rae. 1862 ). सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकतो.)

  • १ ।।