पान:भाषाशास्त्र.djvu/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाषाशास्त्र.



इतिइतिकर्तव्यतेची प्रेरणा.

ही मनांत येऊन, व माझ्या कर्तव्यतेला जागरुक होऊन, अशा प्रकारचे साहस करण्यास मी केवळ भीतभीतच प्रवृत्त झालों आहे.

व त्यापासून होणारा कार्यभाग.

 शिवाय, माझ्या अल्पप्रयत्नांत असंख्य दोष व अक्षम्य विसंगता ठिकठिकाणीं असणारच. तेव्हां, निदान ती काढण्याच्या हेतूनें तरी, एकाद्या विद्वानास स्फूर्ती होऊन, अथवा अकस्मात् उत्तेजन मिळून, त्यानें ह्या प्रिय महाराष्ट्र भाषेची सेवा केल्यास, मजला मातृ व पितृ सुखाच्या लाभासारखाच अत्यानंद होऊन, माझ्या श्रमाचें चीज होईल; आणि माझे सर्व इष्टहेतु सिद्धीस गेल्याप्रमाणेंच मी स्वचित समजेन.

अल्पकारण व महत्कार्य.

 असो. हे भाषाशास्त्र इतक्या योग्यतेचें आहे तरी, त्याचे बीजांकूर अगदींच क्षुद्रसे भासतात; व त्या योगानें, निदान प्रथमतः तरी, त्याचें यत्किंचित् देखील महत्व आपणांस वाटत नाहीं. किंबहुना, ह्या जगांतील बहुतेक महत्वाच्या गोष्टींचें मूळ पाहूं गेलें असतां तें अगदीं अल्पसेंच असतें; आणि त्यामुळें, त्याचा खरा प्रभाव निदान प्रथम दर्शनीं तरी आपल्या लक्षांत बिलकूल येत नाहीं.

 उदाहरणार्थ, वैदिक कालांतील आमचे यज्ञच घ्या. हे बाह्यदृष्टया जरी आपणांस सामान्यसे वाटतात, तरी ज्योतिःशास्त्र प्रगल्भतेस येण्याला तेच कारणीभूत झाले आहेत. एवढेंच नव्हे तर, ज्योतिःशास्त्राचें ते एक मूळ बीजच