Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सामान्यविवेचन व दिग्दर्शन.

होऊन राहिले आहेत. फार तर काय सांगावें, पण, ह्या प्राथमिक अंकुरावरच नित्यनैमित्तिक होमहवनांचे भरपूर सिंचन झाल्यानें, त्याचा ज्योतिःशास्त्ररूपी एक मोठा वृक्षच बनत गेला; व तो कालान्तरानें नांवारूपासही आला. निदान, तो आमच्या प्रचंड आर्यधर्माचा तरी खचितच मजबूत पाया होय, यांत तिळमात्रही शंका नाही.

यज्ञेनयज्ञमयजन्तदेवास्तानिधर्माणिप्रथमान्यासन् ।
तेहनाकंमहिमानःसचन्तयत्रपूर्वेसाध्याःसन्तिदेवाः ॥

(ऋग्वेद.)

यज्ञवेदिकामुळे भूमितिशास्त्राचा उद्गम.

 भूमितिशास्त्राची देखील अशाच प्रकारची हकीकत आहे. आमच्या यज्ञांत वेदींची मोठी आवश्यकता असून, त्या अगदीं रेखलेल्या, भिन्नभिन्न आकृतींच्या, व


 १ असें आमचें मत असून, कित्येक पाश्चात्यांचेही त्याचप्रमाणें आहे.

 Asiatic Researches, Colebrooke, Max Muller ( What can India teach us ), Cassini, Bailly, Playfair, Weber (History of Sanskrit Literature ),

 भारतीय साम्राज्य. पू. पु. २ रें. पान ८८ ते ९०, इत्यादि पहा.

 मॉक्समुलर म्हणतो :-

 "It is well known that most of the Vedic sacrifices depend on the moon, far more than on the sun." "The seasons and the sacrifices were in fact so intimately connected together in the thoughts of the ancient Hindus that one of the commonest names for priest was Ritvig, literally the season sacrificer" (What can India teach us ? First Edn. P. 127. )

 सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता.)