Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. १३५ * याप्रमाणे, अन्तर्गत प्रमाणांवरून, व अनेकभाषातुलनाप्रकाशाने, संस्कृत, ह्मणजे अर्थातच प्राक्कालीन आर्यभाषा किंवा वैदिक संस्कृत, हीच मायभाषा अथवा सर्व भाषांची आदिजननी असल्याचे सिद्ध होते. मात्र, इतकी गोष्ट आह्मांला सुद्धा कबूल आहे , विद्वज्जनांच्या अत्युत्कट प्रयत्नानी अनेक संस्कार होऊन, जी आर्यभाषा केवळ पूर्णत्वाला आणि उन्नतावस्थेला पोहोचली, तिला सहजच संस्कृत में अन्वर्थ नामधेय प्राप्त झाले. तात्पर्य, आर्यभाषा, वैदिकभाषा, व संस्कृत, हे निव्वळ पर्याय शब्द होत. आणि हीच गोष्ट कियेक नावाजलेल्या पाश्चात्यांस व विद्वन्मुकुटमण्यांस देखील पूर्णपणे संमत आहे, असे त्यांच्याच ग्रंथावरून वाचकाच्या लक्षांत आपोआप आल्यावांचून खचितच राहणार नाही. कोलबूक हा वैदिक भाषेला मातृपदाचा बहुमान देतो. कञ्चन म्हणतो की, झन्द, ग्रीक, ल्याटिन् गाँथिक, इत्यादि | १ कोलबूक म्हणतो, “ The cancient diculect * * * especially that of the three first Vedas is extremely difficult and obscure : and...curious, as the punreat of a more polished and refined language ( the classdccct Sunskrit. ). | ( H. T. Colebrookers Misc. Essays. vol. I. 1872. P. 113 ). २ कञ्चनने एके ठिकाणी असे लिहिले आहे की, “ I venture to affirm nat they ( other languages such as Zandic, Gy 2k, ILatin, Gothic, &c ) have all spirung at different chronological periods from the Sanskrit, (i, e. the Vedac Socuslerit ). | ( J. R. A. S. vol. XV1. P. 17. )