Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उगमस्थान, १२७ मतः अत्यन्त तप्तावस्थेत असून, तो कालान्तराने निवत चालला. मात्र, सपाटीवर आलेला भाग लवकर निवाला, व हिमालयासारख्या अत्युच्च प्रदेशाने आपले डोके प्रथम बाहेर काढले. पुढे, ह्या हिमनगाच्या आसमंतांतील भाग कालान्तराने थंड होत जाऊन, ते कोरडा पडत गेला, आणि त्या योगाने, व आसपासच्या परिवेष्टनानुरूप, वनस्पति, जीवजंतु, व मानवप्राणी, यांची उत्पात्त होण्यास सहजच अनुकूलता प्राप्त झाली. अर्थात्, ह्या हिमाचलाच्या नैऋत्य दिशेचा व दक्षिणेकडील निम्न प्रदेश भरतखंड होय. येथेच आमचे आर्यपूर्वज जन्मले. येथेच ते मोठ्या नांवालौकिकास आले. येथेच त्यानीं वेद गाइले. आणि येथूनच, ( ते साहसी असून, त्यांची वस्ती व प्रजा वाढत्या प्रमाणावर असल्या कारणाने, ) ते पूर्व, पश्चिम, दक्षिण, व उत्तर, या चोहों दिशेला पसरले, आणि उत्तरधुवाकडील प्रदेशांतही गेले. तेथे गेल्यावर, कालान्तराने जलविप्लव झाला; व तो केवळ प्रळयकाळच भासला. त्यामुळे, उघडच, सर्वत्र वाताहात झाली; आणि हल्लों भूगर्भात, बफखाली, 9 “ The globe was immensely hotter than it is no. " ।

  • It has been gradually cooling. * * * The outer parts have cooled and become solid. "

( Geikie's Geology. 1898. P. 100. ) 2 « Where Mountains now stand, the Sea once rolled. ( Geikie's Geology. P 26 ). 3 भारतीय साम्राज्य. पु. १६ वे पहा. (हें ही छापत आहे.)

  • हा जलविप्लव कोणत्या कारणांनी होतो, हे भशास्त्रज्ञांस देखील निश्चयात्मक सांगता येत नाहीं.