Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. १२१ आर्मीनियांत, व्हॉन सरोवराच्या तळाशी असल्याचे सांगतो. कित्येकांचे असे म्हणणे आहे की, वारिविप्लवाने सर्वांचाच विध्वंस झाल्यामुळे, आतां ईडनचा शोध लागणे शक्य नाहीं. परंतु, कॉल्व्हिन हा या मताविरुद्ध आहे, आणि तो ईडन् हें | सुभ्रता नदीच्या मुखाजवळ असल्याचे लिहितो. हरझॉग नामक जर्मन पंडिताने एके ठिकाणी असे प्रतिपादन केले आहे की, ईडनचा कथाभाग ह्मणजे पौराणिक कालांतील काल्पनिक भूवर्णनच होय. पण, प्रीसेलचे तसे मत | नसून, सुभ्राता व शिघ्री नद्यांच्या संगमावरच ईडन आहे, असे ते ह्मणतो; आणि डिलमन् तर, भरतखंडाच्या उत्तरेस | हिमालय पर्वतावरच ईडन् असल्याचे लिहितो. कांहींचा | असा अभिप्राय आहे की, जुन्या करारांतलें प्रथमचे विवेचन तत्वविषयक व काल्पनिक आहे. शिवाय, मानवी प्राण्याच्या जन्मभूमीचा बहुमान आपल्याच देशाला प्राप्त झाला होता, असे चाल्डी-बाबिलोनियन लोकांचे केव्हां देखील मत नव्हते; आणि शंकाकृति लेखांवरून सुद्धा तसे असल्याचे दिसत नाही, असें ली-नमैंट ह्मणतो. आसिरीभाषाकोविदांच्या समजुतीप्रमाणे, सुभ्राता ही जगद्रज्जु असून, कित्येकांचा १ The Natural Genesis. ( vol II. P. 231 ) २ युफ्रेटीज्. ( कुंटेहत षड्दर्शनचिन्तनिका पहा.) ३ टायग्रीजू. ( कुटेरुत षड्दर्शनचिन्तनिका पहा. ) ४ Schenkel's Bibel Lycicon. s Lichtenberg's Encyclopedie des Sciensos Relig. ienses. ६ Les Origines de 1’ Historic. Paris 1882. ७ Rope of the world. (William. F. Warren's “Paradise found." ). Boston, 1893. P. 31, ११