पान:भाषाशास्त्र.djvu/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ भाषाशास्त्र. असा अभिप्राय आहे की, गंगा, सुभ्राता, शिधी, व नील नदी, ह्या केवळ एकाच नदीच्या अनेक शाखा होत; व कांहीं कांहीं तर, ही सभ्राता नदी आशिया ( इराण ), आणि आफ्रिका ( मिसोपोटेमिया ), या खंडद्वयांतच असल्याचे सांगतात. परंतु, ग्रॉव्हिल पेन् हा वायबलाचा कट्टा अभिमानी असल्यामुळे, तो असे प्रतिपादन करतो की, ख्रिस्ती पवित्र शास्त्रांत सुभ्राता नदीच्या संबंधाचा जेवढा म्हणून लेख किंवा उल्लेख आहे, तेवढा प्रक्षेपच होय. अर्थात, हा उघडच दुराग्रह दिसते. याप्रमाणे, ईडन् ही मानवी प्राण्याची व अतएव कोणत्याही आदिभाषेची जन्मभूमि असल्याबद्दल ऐकमत्य नसून, ती गोष्ट राइट, व प्रोफेसर ईबर्स, या पाश्चात्य विद्वानांनी देखील कबूल केली आहे. आणि डाक्तर जूलियस ग्रिल्ल तर असे स्पष्टपणेच सांगतो की, बायबलांतील ईडनांत ऐतिहासिक खरेपणाचा लेशमात्रही नाहीं. असो. बायबलाचे तत्व, त्याची सत्यता, व त्याचे महत्व, या संबंधाने ख्रिस्ती राष्ट्रांतील मोठमोठ्या पंडितांचे सुद्धा फारच प्रतिकूल मत असून, ते ह्या धर्मग्रंथाच्या बाबतीत केवळ नाकेच मुरडैतात, आणि त्याला निव्वळ थट्टाच | १ Josephus. २ Paradise found. P. 29. 5 रेव्हरंड. एम. डी. प्रेसेन्स हा असे म्हणतो की, आमच्या खिस्ती धर्म पुस्तकांइतका वेडगळ, असंबद्ध, आणि अनर्थक, असा ग्रंथ पृथिवीच्या पाठीवर कोठेही सांपडणार नाहीं. The Rev. M. de. Pressense admits that rationally " there exists no book more absurd and empty than our gospels. " ( Bible in India. P. XI )