पान:भाषाशास्त्र.djvu/104

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ९५ वाद चालवितात. ह्या बाबतींत, सेंट बॉसिल, यूनोमियर्स, सेंट ग्रेगरी, इत्यादींचें चाललेले खडाजंगी वागयुद्ध खचि. तच पाहण्याजोगे व ध्यानात ठेवण्यासारखे आहे. असो. कांहीं पाश्चात्यांची आणखी अशी कल्पना | आहे की, भाषेचे खरे जावत धातूंत, अनुकरणात्मक शब्द. ह्मणजे क्रियापदांत असून, ह्या धातेची मूळ उत्पत्ति केवळ अनुकरणपद्धतीनेच झाली आहे. अर्थात्, नाना प्रकारचे जे जे ध्वनी आपण ऐकिले, त्या त्या प्रमाणे आपल्या कर्णरन्ध्रांत त्यांचा संस्कार होऊन भिन्न भिन्न धातू बनले; अथवा त्यांचे नानाविध शब्द झाले; अगर त्यांचा मूळरूपें प्रचारांत आली. शिवाय, ह्यांच्या उपपत्तीप्रमाणे, मनुष्य हा प्रथमतः एक मुका प्राणी असून, त्याजवर या स्थावर जंगम सृष्टीचा व पशुपक्षादिकांचा संस्कार होऊनच तो बोलावयास ला. गला, आणि भाषाभिज्ञ झाला. अर्थात्, मेघांचा गडगडाट, विजांचा चकचकाट, समुद्राची गर्जना, वा-याचा सोसाटा, पक्षांचा किलकिलाट, कोकिलांचें कूजित, सपचा फत्कार, गाईचे हंबरणे, घोड्याचें खिंकाळणे, कुत्र्याचे भोंकणे, इत्यादि नानाविध प्रकार श्रवणगोचर झाल्यावर, ते ते विषय, त्या त्या वस्तू, व ती ती द्रव्ये व्यक्त करण्यासाठी, किवा त्यांचे उद्बोधन व्हावे ह्मणून, श्रुतिपथावर आलेल्या सर्व ध्वनींचे यथार्थ अनुकरण करण्याचा त्याने निश्चय केला. पुढे, हा प्रयत्न ब-याच अंशाने सिद्धीस गेल्याचे १ एतद्विषयक “HIorne Tooke's Diversions of Purler नामक ग्रंथ पहावा. ...