Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हैं 1- ९६ भाषाशास्त्र. पाहून, त्याने आपले परिश्रम सतत आणि वाढत्या प्रमाणांवर चालविले. त्यामुळे, योग्य अनुकरणाने कांहीं शब्द बनून, त्यांचा बराच समुदाय झाला, व त्याची कालान्तराने भाषा बनली. ह्या मताचे उत्पादक हर्डर वगैरे अनेक तत्ववेत्ते असून, हंबारवोपपत्ति. ह्या उपपत्तीला हंबारवोपपात्त, अशी आपण संज्ञा देऊ. कारण, हिचे मूळ तत्व अनुकरणात्मकशब्द हेच आहे. आणि गाय हंबरडा फोडत, म्हणून जसे आपण तिला हम्मा म्हणत; व हंबरड्याचा वाचक हम्मा किंवा गाय शब्द आहे, असे ज्याप्रमाणे आपण तान्ह्या मुलास समजावितो, त्याचप्रमाणे दूसच्याही सर्व वस्तूचे, निदान बहुतेक शब्दांचे तरी खचितच आहे, असे कित्येक समजतात. परंतु, ही उपपाते सर्वांशी खरी नाही, हे कोणालाही आक्षेप. सहज कळण्यासारखे आहे. कारण, अनुकरणात्मक शब्द आणि अनुकृत विषय, याच्यांत बहुतकरून फारसा मेळ असल्याचे दिसत नाहीं. उदाहरणार्थ, मराठीत, कुत्रा व भोंकणे, अगर घोडा व खिकाळणे; किंवा संस्कृतांत, घोटः व हेषितं; अथवा इंग्रजीत, लॅम्ब व ब्लीटिंग (Lamb and bleating ), अथवा हाँग व ग्रंटिंग ( Hog and grunting ); इत्यादि शब्दांत परस्पर कांहींच अनुकरणात्मक साम्य नाही. आणि जरी कांहीं कांहीं शब्दांत हे साम्य विशेष दिसून येते, तरी तेवढ्याव| १ ह्या उपपत्तीला मॉक्समुलरनें बोवो ( Bow-Wow theory ) असे नांव दिले आहे. ( मॉक्समुलरची भाषाविषयक व्याख्याने पहा. )