भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ९३ होत नाही. मात्र, परमेश्वराने मनुष्याला बुद्धि दिली आहे; इतकेच नव्हे तर, तिचा विनियोग वैदग्ध्याने व चातुर्याने करण्याविषयीं देखील त्याने त्याच्यांत सुमतीची योजना केली आहे, इतकी गोष्ट कोणालाही कबूल केली पाहिजे. अमुक वस्तूचे अमुक नांव आहे, असे ईश्वराने खचिआक्षेप. तच केव्हां देखील सांगितले नसावें. अथवा अमक्याला अमुक नामधेयाने हाक मारा, अशी ][ची आज्ञाही असेलसे वाटत नाही. कारण, तसाच काहीं व हार असता, तर अखिल भूतलावरील, किंबहुना विश्वांपल भाषा एकच असती. परंतु, ज्यापेक्षा तसे नाही, त्यावहां मनुष्यानेच आपल्या बुद्धीप्रमाणे संज्ञा ठविल्या; २णि आपल्या आवश्यकतेनुरूप सांकेतिक चिन्हें तयार ली. पुढे, ती एकंदर समाजांत अमलांत आली, व त्यांची क कायमची भाषा बनली, असेच म्हणणे सयुक्तिक दिसते. उदाहरणार्थ, घर बांधण्याची जिज्ञासा होऊन, अमुक एक तव्हेने आपले घर बांधावे, किंवा देवालय तयार करावे, म्हणून जी बुद्धि अगर कल्पना झाली, ती केवळ ईश्वराचीच देणगी आहे, असे म्हटले पाहिजे. परंतु, जे. घर किंवा मंदिर मनुष्याकडून बांधण्यात आले, ती निव्वळ मानवी कृतीच होय, यांत शंका नाहीं; आणि तसे मानल्याशिवायही गत्यन्तर नाहीं. याप्रमाणे, भाषेच्या उपपत्तिसंबंधाने पौरस्त्य कल्पनेचा विचार झाला; आणि आह्मां आयचे तद्विषयक काय म्हणणे आहे, याविषयीचे अवश्य ते दिगदर्शन केले. सबब,
पान:भाषाशास्त्र.djvu/102
Appearance