24 ९२ | भाषाशास्त्र भाषाशास्त्र, होण्यासाठीच केल्या होत्या. सबब, त्या योजलेली क्रिया प्रदर्शित करीत, यांत संशय नाही. तथापि, ह्या बाबतींत, स्मृतिकारांचे मत याहून अग दांच भिन्न असल्याचे दिसते. कारण, भाषेसंबधी मनूचा सष्टपदार्थातील वस्तुमात्रांची नांवें अभिप्राय. | कशी पडली, याविषयी मनूने केवळ निराळ्या त-हेचेच विचार प्रदर्शित केलेले असून, तींत असे सांगितलेले आहे की, परमात्म्याने सृष्टि निर्माण केल्यावर, त्याने प्रत्येकाची भिन्नभिन्न कर्मे निवेदन केली, आणि जातिवाचक नांवेही दिली. सर्वेषांतु सनामानि कर्माणि च पृथक् पृथक् । वेदशब्देश्य एवादा पृथक्संस्थाश्च निर्ममे ॥२१॥ ( मनुस्मृति. अ. १ ला. ) | ह्यावरून, भाषाविषयक किंवा शब्दोत्पत्तीच्या संबंधाने मनुस्मृतिकाराचे अगदी भिन्न मत असल्याचे दिसते. | कित्येकांचे असे म्हणणे आहे की, भाषा ही अमानुषी अन्य पौरस्त्यमत, आहे, व ती परमेश्वरापासूनच उत्पन्न झाली. ह्यामुळे, अर्थात्च वादविवादास पुष्कळ जागा राहिली. फार तर काय सांगावे पण, एतद्विषयक यूरोपखंडांत तर बराच वादविवाद सुरू होऊन, शेवटीं रणकंदनही मातलें. परंतु, वास्तविक रीतीने विचार करत असे दिसते की, जरी परमेश्वर हा अखिल विश्वाचा कर्ता आहे, व त्याच्याकडे सर्व सष्टीचे नियंतृत्व आणि चालकत्व देखील आहे, तरी मानवी प्राण्याची भाषा उत्पन्न करण्यांत, त्याचा प्रत्यक्ष हात असल्याचे बिलकुल वाटत नाहीं, अगर अनुमानसुद्धा
पान:भाषाशास्त्र.djvu/101
Appearance