पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धार्मिक तयारी ८९ जागी न रहाणे, घरांत केरकचरा, घाण वगैरे सांचू न देणे, अंगावरील कपडे स्वच्छ ठेवणे, आंथरूण-पांघरुण रोज उन्हांत तापविणे वगैरे आरोग्याच्या अनेक बाबींचा विचार व शिक्षण याच संस्थांना देतां येईल, या बाबी राजकारणाच्या व म्युनिसिपल कायद्यांच्या कक्षेच्या बाहेर पडतात व त्या धर्मातच येणे योग्य होय, जे लोक ही बंधने नीट पाळीत नसतील, सांगून सवरून सुद्धां मुद्दाम न मानतील, त्यांना धार्मिक संस्थांत कमी लेखून. त्यांची घरे निराळ्या टापूंत ठेवावी असा निबंध करावा अगर कसे वगैरे गोष्टींचा विचार या सर्वधर्मीय संस्थांनाच नीट करता येईल, के वेश्यागृहे, मद्यपानगृहे, व्यसनगृहें कोठे असावीं, लोक व्यसनी होऊ नयेत म्हणून काय करावे, लग्नसंबंध न करण्यालायक रोगी, दुर्व्यसनी लोक कोणते, त्यांशी शरीरसंबंध कसा टाळावा, अनीतिवर्तक लोक कसे कह्यांत ठेवावे, अनीतिवर्धक पुस्तकें, खेळ, नाटके तमाशे, सिनेमा, वगैरे कोणते या सर्व बाबी या संस्थांकडे सोपवाव्यात, गरीब व कामकरी वगैरे लोकांच्या ऐपतींत सुखकारक व सोईस्कर अशा नमुन्याच्या चाळी बांधवून त्यांत त्यांस राहण्याची सोय करून देणे इत्यादि हरएक प्रयत्नांनी लोकांची रहाणी आरोग्यकारक, नीतिमा व व्यवस्थित होईल यासाठी व्याख्याने वगैरेंनी लोकांस उपदेश करणे, त्यांस योग्य वळण लावणे, त्यांचा घामटपणा घालविणे, ही कामें या संस्थांनी करावी. घरांतील चौक वगैरेत पाणी मुरून जमीनीस ओल येऊ नये, पिण्याच्या पाण्यांत घाण पाण्याची मिसळ होऊन रोगराई होऊ नये, अव्यस्थित वागण्यामुळे झालेल्या रोगराईचा फैलाव होऊ नये, फैलाव झालाच तर लोकांस घरोघर व पडल्या अंथरुणावर औषधपाणी मिळावे असली धर्मकृत्ये, त्यांबाबद कथा, मेळे वगैरे या संस्थांनी काढावेत. स्वयंपाक घरांत वापरावयाची भांडीकुंडी मोलकरणी व घरच्या बायका कशी घासतात व स्वच्छ करतात, त्याबाबद भांडी फार न झिजतां, कडेवर न फुटतां, कशी स्वच्छ करावी; धुणी न फाटतां जास्त स्वच्छ कशी करावी वगैरे माहिती या संस्थांनी जनतेत पसरावी. दरएक माणसाने आपले काम थोडक्या वेळांत व मेहनतींत उरकून सार्वजनिक कामांत व उत्पन्नांत भर कशी घालावी हे या संस्थांनी नमुनेदार कुटुंबे तयार करून दाखवावें, आळीतील लोकांना त्या घरांत नेऊन त्यांनी कशी व्यवस्था